You are currently viewing कुडाळ नगरपंचायतीचे भाजपा नगरसेवकांनी केले आन्दोलन: नगरपंचायतीच्या पाय-यांवर बसून केली निदर्शने

कुडाळ नगरपंचायतीचे भाजपा नगरसेवकांनी केले आन्दोलन: नगरपंचायतीच्या पाय-यांवर बसून केली निदर्शने

कुडाळ नगरपंचायतीचे भाजपा नगरसेवकांनी केले आन्दोलन: नगरपंचायतीच्या पाय-यांवर बसून केली निदर्शने

सत्ताधारी महाविकास आघाडीच्या गैरकारभारावर दिल्या जोरदार घोषणा

कुडाळ

कुडाळ नगरपंचायतीच्या सत्ताधारी महाविकास आघाडीच्या कारभारावर ताशेरे ओढत भाजपा नगरसेवकांनी आन्दोलन छेडले. नुकत्याच उद्घाटन समारंभ पार पडलेल्या बालोद्यानमधील भ्रष्टाचार भाजप नगरसेवकांनी चव्हाट्यावर आणला.तर भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरण व लसीकरण मोहीमेत लाखों रुपये उधळले गेले असल्याची तक्रार भाजपा नगरसेवकांनी केली आहे.आज कुडाळ नगरपंचायतीच्या

पाय-यांवर बसून भाजपा नगरसेवकांनी निदर्शने केली.
कुडाळ भाजपच्या नगरसेवकांनी कुडाळ नगरपंचायतीच्या पाय-यांवर बसून सत्ताधारी महाविकास आघाडीच्या कारभाराच्या विरोधात आंदोलन छेडले.

यावेळी भाजपचे नगरपंचायतमधील गटनेते विलास कुडाळकर, नगरसेविका संध्या तेरसे, नगरसेवक अभिषेक गावडे यांसह अन्य लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

सत्ताधारी महाविकास आघाडीच्या कारभारावर भाजपचे नगरसेवक आक्रमक झाले आहेत. नुकत्याच उद्घाटन समारंभ पार पडलेल्या बालोद्यानमधील कारभारावर ताशेरे ओढण्यात आले. या बालोद्यान कामात निधीची उधळपट्टी झाल्याचा आरोप भाजपने केला आहे. उद्घाटन समारंभाच्या पुर्वी भाजप नगरसेवकांनी आक्षेप घेत बालोद्यान कामात चौकशीची मागणी केली होती. त्याच बरोबर कुडाळ नगरपंचायतीने भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरण व लसीकरण मोहीमेत घोटाळा झाल्याचा दावा केला आहे. या प्रकरणात कुडाळ नगरपंचायतीने १७ दिवसांत ५०० कुत्र्यांवर शस्त्रक्रिया केली असा अहवाल सादर केला.पण या मोहिमेत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा भाजपचे गटनेते विलास कुडाळकर यांनी दावा केला आहे.
यांसह विविध प्रश्नांवर भाजपा नगरसेवकांनी आन्दोलन छेडले आहे.आज संपन्न होणाऱ्या नगरपंचायतीच्या सभेच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन छेडले आहे त्यामुळे या आंदोलनामुळे सत्ताधारी महाविकास आघाडीचे नगरसेवक अडचणीत आले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा