त्या मृतदेहाची ओळख अखेर पटली

त्या मृतदेहाची ओळख अखेर पटली

सावंतवाडी
सावंतवाडी शहरातील नगर पालिकेच्या जिमखाना मैदान परिसरातील हॉटेल समोर शुक्रवारी सायंकाळी परप्रांतीय कामगाराचा मृतदेह आढळून आला. मारुती जामाप्पा नाईक (३८, रा.मनीकट्टी, बेळगाव ) असे त्याचे नाव आहे. याबाबत पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मयत मारुती हा सावंतवाडी शहरामध्ये गेले कित्येक वर्षे मोल मजुरीचे काम करत होता. त्याचे अन्य कोणीही नातेवाईक शहरात नसल्याने तो कुठेही रात्री झोपायचा. बरेचदा मोती तलावाच्या काठावर झोपल्याने तो तलावातही पडला होता. मात्र, तो त्यातून सुखरूप वाचला होता असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जिमखाना मैदान परिसरातील हॉटेल समोर तो निपचित पडलेल्या अवस्थेत होता. काही जणांनी खात्री केली असता तो मयत असल्याचे लक्षात आले त्यानुसार सावंतवाडी पोलिसांना कल्पना दिली. त्यानंतर घ पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सुरुवातीला त्याची ओळख पटली नव्हती मात्र त्यानंतर तो सावंतवाडी शहरात मारुती या नावाने तो परिचित असल्याने त्याची ओळख पटविण्यास पोलिसांना यश आले. शहरातील एका ठेकेदाराकडे तो काम करत होता. त्या आधारे त्याच्या नातेवाईकांना याबाबत कल्पना देणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा