You are currently viewing इंडियन ऑईलचा फ्रंटलाईन कामगारांसाठी पुढाकार

इंडियन ऑईलचा फ्रंटलाईन कामगारांसाठी पुढाकार

कोरोना महामारीमुळे जिवनातील प्रत्येक क्षण आज प्रभावित होत गेला आहे. परंतु या संकटाच्या काळातही  काम करणाऱ्या कामगारांची जबाबदारी काही कंपन्या पुढे येऊन घेत आहेत. यामध्ये आपल्या घरापर्यंत सिलेंडर पोहोचवणारे आणि पेट्रोल पंपावर काम करणारे जे कामगार आहेत. त्यांचा समावेश फ्रंटलाईन कामगारांमध्ये करण्यात आला आहे.

देशातील सर्वात मोठी ऑईल मार्केटिंग इंडियन ऑइल कंपनी इंधनाचा पुरवठा करणार असल्याचे निश्चित केले आहे. परंतु या संकटाच्या काळात सेवा देणाऱ्या कामगारांची सुरक्षा लक्षात घेता त्यांच्यासाठी इंडियन ऑइल लसीकरणाची मोहीम चालविणार असल्याची माहिती आहे.

 उत्तर विभागीय कार्यालयातील दिल्ली एनसीआर मधील एलपीजी बॉटलींग प्रकल्प, पीओएल ठिकाण, एव्हिएशन फ्युल स्टेशन, रिटेल आउटलेट यासारख्या ग्राहकांशी संपर्क येणाऱ्या ठिकाणी लसीकरणाचे शिबिर आयोजित केले जाणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven − 5 =