सावंतवाडी तालुका ज्येष्ठ नागरिक संघातर्फे संविताश्रमास मदत

सावंतवाडी तालुका ज्येष्ठ नागरिक संघातर्फे संविताश्रमास मदत

सावंतवाडी

कोव्हीड परिस्थितीमूळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कुडाळ तालुक्यातील अणाव पणदूर येथील संविताश्रमाने सावंतवाडी तालुका ज्येष्ठ नागरिक संघास मदतीसाठी आवाहन केले होते. या आवाहनास अनुसरून व आश्रमाचे सेवाकार्य पाहून ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभासदांनी भरघोस प्रतिसाद दिला.

या पार्श्वभूमीवर जमा झालेल्या निधीतून आश्रमासाठी कपडे, वैद्यकीय साहित्य, औषधे व धान्य स्वरुपात भरघोस मदत केली. आश्रम प्रशासनाने या मदती बद्दल सावंतवाडी ज्येष्ठ नागरिक संघाचे आभार व्यक्त केले आहेत. यापुढेही आवश्यकता भासल्यास मदत करण्यात येईल अशी ग्वाहीही जेष्ठ नागरिक संघाने आश्रम प्रशासनास दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा