बॉलीवूड गाण्यावर रोमान्स करणे पडले महागात; डीएसपी ने बजावली नोटीस

बॉलीवूड गाण्यावर रोमान्स करणे पडले महागात; डीएसपी ने बजावली नोटीस

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकारने लॉकडाऊन पर्याय स्वीकारला. मात्र यामुळे पोलिसांच्या मनस्ताप मात्र कमालीचा वाढला आहे. कोरोनाशी दोन हात करत दिवस-रात्र पोलिसांनी काम करावे लागत आहे. एकीकडे सर्वसामान्य माणूस घरात बसला आहे तर दुसरीकडे मात्र पोलिसांनी आपल्या सुट्ट्या रद्द करून जनतेच्या रक्षणासाठी अधिक वेळ काम करावे लागत आहे. अशा त्रस्त वातावरणात चार विरंगुळ्याचे क्षण म्हणून एका पोलीस जोडप्याने बॉलीवूड गाण्यावर डान्स करण्यास सुरुवात केली. त्यांचे हे रोमँटिक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

 

हे पोलीस जोडपे दिल्लीमधील आहे. त्यांनी लोक डॉन ड्युटीवर असतानाच पोलिसांच्या गणवेशात बॉलीवूड गाण्यावर डान्स केला आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. हे व्हिडिओ पाहून काही जणांनी त्यांचं कौतुक केलं. तर काही जणांनी त्यांच्यावर टीका केली. या व्हिडीओची नोंद आता दिल्ली पोलीस प्रशासनाने देखील घेतली आहे. डीएसपी उषा रंगानी यांनी त्यांना अधिकृत नोटीस बजावली आहे. ऑनड्युटीवर असताना व्हिडीओ शूट करण्यामागे कारण त्यांना विचारलं गेल. शिवाय त्यांना काही दिवसासाठी सस्पेंड करण्यात आल आहे. अनेकांनी पोलिसांच्या या व्हिडिओवर टीकेचा वर्षाव केला आणि त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा