You are currently viewing प्राणजीवन सहयोग संस्था जिल्ह्यात राबवत असलेला सँनिटायझर उपक्रम जिल्ह्यात आदर्शवत ठरेल – आर.जे.पवार

प्राणजीवन सहयोग संस्था जिल्ह्यात राबवत असलेला सँनिटायझर उपक्रम जिल्ह्यात आदर्शवत ठरेल – आर.जे.पवार

कणकवली

“माझा गाव माझी जबाबदारी “या ऊक्तीप्रमाणे कोरोनाच्या संकटकाळात गावातील लोकांच्या सुरक्षितेसाठी प्राणजीवन सहयोग संस्थचे संस्थापक अध्यक्ष तथा उद्योजक संदीप चौकेकर यानी कोव्हीड 19 चा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपल्या संस्थेतर्फे सँनिटायझर फवारणी करण्याचा घेतलेला निर्णय निश्चितच जिल्ह्यात आदर्शवत ठरेल असे गौरवोद्गार कणकवली तहसीलदार आर.जे.पवार.यांनी काढले.ते कणकवली तालुक्यातील शिरवल येथील विठ्ठल रखुमाई मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.यावेळी तहसीलदार आर.जे.पवार या़चे संस्थेचे अध्यक्ष संदीप चौकेकर यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात आला.तसेच विठ्ठल रखुमाई मंदीराच्या वतीनेही त्यांचा सत्कार करण्यात आला होता.
यावेळी मोफत सँनिटायझर फवारणी शुभारंभ तहसीलदार आर.जे.पवार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.


प्राणजीवन सहयोग संस्था आयोजित सँनिटायझर फवारणी शुभारंभ कणकवली तालुक्यातील शिरवल गावातुन करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर तहसीलदार आर.जे.पवार,संस्थेचे अध्यक्ष संदीप चौकेकर, माजी जि.प.सदस्य संदेश पटेल,सरपंच महेश शिरवलकर, गावप्रमुख रमेश सावंत,ह.भ.प विश्वनाथ गवंडळकर, डॉ. दिलीप घाडी,प्रभाकर करंबेळकर, पोलिस पाटील विजय शिरवलकर, ग्रा.पं. सदस्य रुपेश सावंत, पांडुरंग गुरव,दयानंद कोदे,श्रीकृष्ण यादव,सुनिल कुडतरकर,पंढरी शिरवलकर, प्रवीण तांबे माजी सरपंच मनोज राणे, राजेश शिरवलकर,प्रशांत कुडतरकर, प्रमोद नानचे, प्रमोद सावंत,प्रदीप गावडे,सुचित गुरव, गुरुप्रसाद वंजारे, तलाठी सरीता बावलेकर, आरोग्य सेवक सुनील चव्हाण आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आर.जे.पवार म्हणाले, प्राण जीवन सहयोग संस्थेच्या माध्यमातून कणकवली तालुका सॅनिटायझर करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे .याचा शुभारंभ शिरवल गावातून होत आहे.निश्चित आपल्या कणकवली तालुक्यामध्ये शिरवल गाव एक वेगळा आदर्श घेऊन जातो आहे. कणकवली तालुक्यामध्ये जेव्हा कोरोनाचा दुसरा पर्व सुरु होतोय, असे वाटत असताना प्राणजीवन संस्थेचे अध्यक्ष संदीप चौकेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सॅनिटायझर करण्याची संकल्पना केली आहे. आणि ती निश्चितच आपल्या कणकवली तालुक्यामध्ये शिरवल गावातून होत आहे, त्यामुळे शिरवल गाव एक आदर्श घेऊन जातो आहे असे ही ते म्हणाले. असेच अन्य तालुक्यांमध्ये सॅनिटायझर करण्याची प्रेरणा लोकांना मिळेल . संदीप चौकेकर यांचे काम चांगल्या प्रकारचे असून आदर्श घेण्यासारखे आहे. प्राणजीवन संस्थेच्या माध्यमातून राबवत असलेले उपक्रम निश्चितच स्तुत्य आणि कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार तहसीलदार आर.जे. पवार यांनी काढले.
प्राणजीवन सहयोग संस्थेचे अध्यक्ष संदीप चौकेकर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले कि,कोव्हीड 19 चा प्रार्दुभाव रोखण्यासाठी माझ्या जिल्ह्यातील जनतेचे जीवन सुखकर व्हावे याच भावनेतून आपण आपल्या संस्थेतर्फे मोफत सॅनिटायझर फवारणी उपक्रम हाती घेतला आहे.यापुढेही जिल्ह्यातील जनतेसाठी काम करत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.शिरवल गावाशी माझी नाळ जोडलेली असून मी शिरवल गावचा सुपुत्र असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. माझ्या गावांतील ग्रामस्थांनी मला दिलेले प्रेम, आपुलकी, आशीर्वाद आणि माझा यथोचित केलेला सन्मान मी कधीही विसरू शकत नाही. सामाजिक बांधिलकी जोपासत असताना मी राबवित असलेल्या विविध उपक्रमांचे तुम्ही केलेले कौतुक आणि माझ्या पाठीवर मारलेली कौतुकाची थाप मला निश्चितच उभारी आणि प्रेरणा देणारी आहे. मला तुम्ही दिलेली ही सकारात्मक उर्जा आहे. शिरवल गावच्या जडणघडणीसाठी प्राणजीवन सहयोग संस्थेच्या माध्यमातून आपण कटिबद्ध आहोत . गावातील तरुणांच्या हाताला रोजगार देण्यासाठी, तसेच गावातील महिला बचतगटांनाही आर्थिक सक्षम करण्यासाठी प्राणजीवन सहयोग संस्थेच्या माध्यमातून गावात शैक्षणिक, आरोग्य विषयक उपक्रम राबविणार असुन शिरवल गावच्या आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी आपण कटिबद्ध आहोत,अशी ग्वाही यावेळी प्राणजीवन सहयोग संस्थेचे अध्यक्ष , उद्योजक संदीप चौकेकर यांनी दिली.
कोरोना महामारीच्या संकटात मदतकार्य केलेल्या कोरोना योद्धयांचा कोवीड योद्धा सन्मानपत्र आणि गुलाबपुष्प देवून सत्कार करण्यात आला.यामध्ये कोवीड योद्धा म्हणून सरपंच महेश शिरवलकर ,पोलीस पाटील विजय शिरवलकर, सुनील कुडतरकर, राजेश शिरवलकर, आरोग्य सेवक सुनील चव्हाण, संकल्प ग्राम संघ अध्यक्षा रसिका शिरवलकर, सचिव तनिष्का कुडतरकर, सी.पी.आर सारिका गुरव ,शेखर स्वयंसहाय्यता महिला समुह बचत गट सचिव ,कोमल कुडतरकर, उपाध्यक्ष प्रचिती कुडतरकर, अंगणवाडी सेविका उर्मिला सावंत, मृगया राणे, साक्षी सावंत ,आधी कोव्हीड योद्धयांचा सन्मानपत्र आणि गुलाब पुष्प देऊन तहसीलदार आर.जे. पवार आणि प्राणजीवन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप संदीप चौकेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राणजीवन सहयोग संस्थेचे कार्यक्रमप्रमुख प्रसाद मेहता, सहकार्यक्रम प्रमुख प्रशांत गावडे, उपाध्यक्ष स्वप्निल पुजारे, सचिव सचिन धुरी यांनी मेहनत घेतली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four + 10 =