साटेली-भेडशी बाजारपेठ बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

साटेली-भेडशी बाजारपेठ बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

दोडामार्ग :

 

दोडामार्ग तालुक्यातील साटेली-भेडशी बाजारपेठेतील सर्व आस्थापने व दुकाने मंगळवार पासून ५ दिवस बंद ठेवण्याच्या ग्राम संनियंत्रण समितीने घेतलेल्या निर्णयाला व्यापार्‍यांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. मंगळवारी सकाळपासूनच कडकडीत बंद ठेवून वाढत्या कोरोना  रुग्ण संख्येला आळा बसण्यासाठी ग्रामस्थ प्रयत्न करीत आहे.

साटेली-भेडशी परिसरातील वाढते रुग्ण संख्या ही चिंतेची  बाब बनली आहे. प्रशासन देखील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. शिवाय ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव अधिक तीव्र होत असल्यामुळे त्याला थोपवण्यासाठी ग्रामपातळीवर निर्णय घेण्याचे आवश्यक बनले आहे. सद्यस्थितीत साटेली-भेडशी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता ग्राम सनियंत्रण समितीने ग्रामस्थ व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवण्याबाबत बैठक घेतली. यावर सकारात्मक चर्चा होऊन बाजारपेठ ५ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. काल मंगळवारी सकाळपासूनच दुकाने बंद ठेवून व्यापार्‍यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. यावेळी पोलीस निरीक्षक यांनी बाजारपेठेतील परिस्थितीचा संपूर्ण आढावा घेतला.

प्रतिक्रिया व्यक्त करा