You are currently viewing हमारी मैफिल में लोग बिन बुलायें आते हैं…

हमारी मैफिल में लोग बिन बुलायें आते हैं…

*क्योकि यहाँ स्वागत में फूल नहीं पलकें बिछायें जाती है!*🎶✨

 

 

सोमवार दिनांक २२/०१/२०२४ रोजी अयोध्या श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठापणा निमीत्ताने… मांडकुली येथील श्री देव लिंगेश्वर मंदिर येथे त्याच गावातील भजनी बुवा, गायक- वादक कलाकारांच्या *_राम रंगी रंगले_* या सुरेल मैफिलीच आयोजन करण्यात आलं होतं. श्री देव लिंगेश्वर भक्त मंडळ, ग्रामस्थ तसेच गावचे मानकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सदाबहार कार्यक्रम संप्पन्न झाला! या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुप्रसिद्ध दशावतार तालरक्षक श्री. हरेश नेमळेकर यांनी केले. या मैफिलीला गावातील जेष्ठ बुवा श्री. श्रीकांत कासले, श्री. सीताराम (बाबी) साऊळ, श्री. संजय तेंडोलकर, श्री. संजय येरम यांच्या प्रभू श्री रामचंद्र यांच्या पारंपरिक तसेच सुरेल गाण्यांनी मैफिलीला अतिशय उत्साही व प्रसन्न वातावरण लाभलं! डबलबारी तसेच भजन क्षेत्रातला संगित वारसा यशस्वीपणे पुढे नेणारे याच गावचे सुपुत्र बुवा श्री. दिपक खरूडे तसेच बुवा श्री. विनोद नाईक यांनी पण आपल्या सुमधुर गायनाने मैफिलीत रंगत आणली. त्याच्या जोडीला त्यांचेच चाहते तसेच नवोदित बुवा व गायक श्री. तुषार सामंत, श्री. राजन काळसेकर, श्री. सुमन गावडे, श्री. धोंडीबा मराठे, बुवा श्री. अमित नाईक, कु. अभिजीत पेडणेकर, कु. मिलींद मसुरकर, कु. सुरज शेगले, कु. परेश कैटकर, कु. वेदांत गावडे आणि कु. अक्षय कासले यांनी सुद्धा आपलं बहारदार सादरीकरण करून उत्स्फूर्तपणे रसिक प्रेक्षकांची मने जिंकली! यांना साथसंगत करण्यासाठी जेष्ठ तबलावादक श्री. मारूती वारंग तसेच नवोदित तबलावादक कु. प्रतिक भोई, कु. स्वप्नील कासकर, कु. वैभव नाईक यांनी तबलासाथ केली. त्याच बरोबर पखवाज साथ साठी याच गावचे सुपुत्र श्री. विष्णु नाईक, श्री. प्रसाद वारंग, श्री. रूपेश सावंत, कु. प्रशांत सावंत आणि कु. अजय कासले यांनी उत्कृष्ट अशी पखवाजसाथ केली. कोरससाठी साथ श्री. ज्ञानेश्वर कासले, श्री. महेश नाईक यांनी केली.

गावातील गायक, वादक कलाकारांसाठी खर तर हि पर्वणीच होती. त्यांना एक व्यासपीठ मिळावं त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव मिळावा या हेतूने खरतर या कार्यक्रमाचे नियोजन केलं होतं. एकाच गावातील वेगवेगळ्या भजनी मंडळातील बुवांनी एकत्र येऊन हा जो संगीत मैफिल कार्यक्रम सादर केला खर तर हा एक आदर्श निर्माण केला आहे. “संगीत” हि एकच अशी गोष्ट आहे जिथे कुठल्याच जातीचा, वर्णांचा भेदभाव केला जात नाही. “संत” कालीन हि संगीत भजन परंपरा अविरतपणे आणि अभेद्य सुरू ठेवण्यासाठी गावातील जेष्ठ व्यक्तींसोबतच नवोदित कलाकार सुद्धा कटिबद्ध आहेत आणि हाच आदर्श आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून मांडण्याचा पुरेपुर प्रयत्न केला आहे. या मैफिलीची सांगता हि सांघिक भैरवी गायनाने झाली. गर्व से कहो हम हिंदू हैं, जय श्री राम🚩 या जयघोषात कालचा संपूर्ण दिवस आनंदपूर्ण वातावरणात साजरा झाला. विशेष म्हणजे कलाकारांना प्रोत्साहन मिळावं यासाठी हरेश नेमळेकर मित्रमंडळ आणि श्री देव लिंगेश्वर भक्त मंडळ यांच्या कडून सहभागी कलाकारांना सन्मानपत्र आणि गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. या संपुर्ण नियोजनासाठी श्री. तातू मुळीक यांचे विशेष सहकार्य लाभले. या मांडकुली गावचे सुपुत्र श्री. निलेश खानोलकर माजी उपसरपंच श्री. दिलीप निचम, पोलिस पाटील श्री. अमित मराठे, श्री. वामन गावडे, श्री. गणेश गावकर, श्री. सिद्धेश धुरी, श्री. संतोष पेडणेकर, श्री. उल्हास मांडकुलकर, कु. नारायण पेडणेकर, तसेच गावातील दर्दी संगीतप्रेमी, प्रेक्षक उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे चित्रीकरण कु. तेजस शेगले यांनी केले. “आम्ही मालवणी” या ६५ हजार पेक्षा जास्त सबस्क्रायबर असलेल्या युट्युब चॅनलच्या माध्यमातून हे चित्रीकरण आपणास पहायला मिळणार आहे. असाच प्रतिसाद, सहकार्य वेळोवेळी लाभो तसेच सर्वांना सुखी, आनंदी आणि निरोगी ऐश्वर्य संप्पन्न आयुष्य लाभो हिच गणपती बाप्पा, प्रभू श्री रामचंद्र, ग्रामदेवता श्री देव लिंगेश्वर, श्री देवी पावणाई माते चरणी प्रार्थना करतो… धन्यवाद! 🙏🏻

*पुढील वाटचालीस सर्वच कलाकारांना मनपूर्वक खुप खुप शुभेच्छा!*❤🙌🌏

 

*_जीते रहो… गाते रहो!_*🥰🎶🙏

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − sixteen =