You are currently viewing मनी लॉण्डरिंग प्रकरणी मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करा; सिंधुदुर्ग काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

मनी लॉण्डरिंग प्रकरणी मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करा; सिंधुदुर्ग काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

मनी लॉण्डरिंग प्रकरणी मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करा; सिंधुदुर्ग काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

सिंधुदुर्गनगरी

भाजप आमदा गणपत गायकवाड यांनी आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे कोट्यावधी रुपये असल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे या मनी लॉण्डरिंग प्रकरणी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना जिल्हा काँग्रेस पक्षाच्यावतीने देण्यात आले.

काँग्रेसने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात, भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी एक महत्त्वाचा कबुलीजबाब दिला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे माझे कोट्यवधी रुपये आहेत. आमदार गणपत गायकवाड यांचा कबुलीजबाब हाच एफआयआर समजून हे मनी लॉण्डरिंगचे प्रकरण आहे, या दिशेने तपास व्हायला हवा. आमदार गणपत गायकवाड यांचा जबाब घेऊन झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेनप्रमाणे शिंदे यांच्यावर त्वरित कठोर कारवाई केली पाहिजे, हे कोट्यवधी रुपये कुठून आले. हा पैसा गुन्हेगारीतून आलेला पैसा आहे की ? भ्रष्टाचाराचा पैसा ? की आणि कुठून ? तसेच हा पैसा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला आहे. हे सरळ मनी लॉण्डरिगचे प्रकरण आहे. त्याबद्दल त्यांना ‘पीएमएलए’ कायद्याने अटक व्हायला हवी. तरी याचा तातडीने तपास होऊन मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी नमूद केलेली आहे.

यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, प्रदेश प्रतिनिधी प्रकाश जैतापकर, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप नार्वेकर, सरचिटणीस रविंद्र म्हापसेकर, कृष्णा धाऊसकर, महेंद्र सांगेलकर, सजय लाड, चंडकांत राणे, सखाराम शेटकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा