जिल्हा खानिकर्म निधी अंतर्गत ६ रुग्णवाहिका सतीश सावंत यांच्या हस्ते लोकार्पण..

जिल्हा खानिकर्म निधी अंतर्गत ६ रुग्णवाहिका सतीश सावंत यांच्या हस्ते लोकार्पण..

जिल्हा खनिकर्म निधी अंतर्गत ६ रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा जिल्हा बँक अध्यक्ष तथा जिल्हा नियोजन सदस्य सतिश सावंत यांचे शुभहस्ते पार पाडला.

या ६ रुग्णवाहिका मिळण्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री  उद्धवजी ठाकरे  यांचे मोठे योगदान आहे. तसेच रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत , पालकमंत्री उदय सामंत, माजी पालकमंत्री दिपक केसरकर,आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाच्या माध्यमातून या ६ नवीन रुग्णवाहिका सिंधुदुर्ग जिल्हयाला मिळाल्या आहेत. गेले काही दिवस या रुग्णवाहिकांबाबतचे श्रेय जिल्हा परिषद घेण्याचे काम करत होती.

जिल्हा खनिकर्म निधीचा वापर रुग्णवाहिका आणण्यासाठी आजपर्यंत कुठल्याही पालकमंत्री यांनी केलेला नव्हता. मुख्यमंत्री  यांनी केलेल्या या कामामुळे जिल्ह्यामधील कोविड रुग्णाची रुग्णवाहिकेमुळे होणारी परवड कमी होणार आहे. त्यामुळे विरोधकांनी श्रेयवादावरून राजकारण करण्यापेक्षा रुग्णासाठी सुवीधा मिळणेसाठी प्रयत्न करावेत असे सतीश सावंत यांनी म्हटले आहे.

यावेळी जि. प. गतनेते नागेंद्र परब, जिल्हा महिला आघाडीप्रमुख तथा जिल्हा नियोजन सदस्या जान्हवी सावंत, उपजिल्हाप्रमुख अमरसेंन सावंत, तालुकाप्रमुख बाळू परब, उपसभापती पं.स. कुडाळ जयभारत पालव, सोमा घाडीगावकर, धर्मा सावंत, बंडू चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी संदेश कांबळे, शव अभियंता कुंभार व अधिकारी वर्ग तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा