पुरस्कारांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

पुरस्कारांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी

भारत सरकारच्या युवा क्रीडा मंत्रालय ,नवी दिल्ली यांनी गांधी खेल रत्न पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार,राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कार व मौलाना अब्दुल कलाम आझाद ट्रॉफी (विदयापीठांसाठी)2021 करिता नामनिर्देशनाचा प्रस्ताव दिनांक 21 जून 2021 रोजी  सायंकाळी 5 वाजेपर्यंत केंद्र शासनास सादर करावयाचे आहेत. अर्जदाराने अर्ज कोणत्याही व्यक्ती अथवा विभागाची शिफारस न घेता थेट केंद्र शासनास surendra.yadav@nic.in किंवा girnish.kumar@nic.inया मेलवर सादर करायवयाचे आहे. पुरस्काराची सविस्तर माहिती,नियमावली व नमुना अर्ज http://yas.nic,in/sports या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्र खेळाडूंनी विहित कालावधीत पुरस्काराकरिता नामांकने सादर करावीत असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे.  

प्रतिक्रिया व्यक्त करा