आरोंदा येथे चिखलाचे साम्राज्य

आरोंदा येथे चिखलाचे साम्राज्य

सावंतवाडी :

आरोंदा पंचक्रोशी मधील पावसाचे पाणी वाहुन जाणारे पाईपात पुर्ण पणे माती व कचरा गेल्याने पाणी वाहुन जाणारे पाईप  बंद झाले आहेत. त्या मुळे  पावसाचे पाणी वाहुन न जाता ते पाणी तेथेच साचुन राहात आहे. त्या मुळे रस्त्यावर पाणी साचते आहे. वाहने चालवताना वाहन चालकांना ही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तेथील रहिवाश्यांना वाट शोधत घरी जाव लागत आहे.

या बाबतची तक्रार रहीवाश्यांनी संबधित खात्या कडे दिली असता त्यावर अजुन काहि न झाल्याचे समजले. आम्ही वारंवार २ वर्ष लेखी स्वरूपात तक्रारी करुन सुध्दा अजुन पर्यंत कोणी ही येऊन बघितले सुध्दा नाही. हे पाणी असेच साचुन राहीले तर  आमच्या घरांना हि धोका निर्माण होउ शकतो. असे तेथील नागरीकांनी सांगीतले. यावर लवकरात लवकर उपायोजना व्हावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा