You are currently viewing देवगडात  एसटी – ट्रकमधील झालेल्या अपघातात दोन प्रवासी जखमी 

देवगडात एसटी – ट्रकमधील झालेल्या अपघातात दोन प्रवासी जखमी 

देवगड

देवगड तालुक्यातील हडपीड येथे एसटी – ट्रक मध्ये अपघात झाला. अपघातामध्ये दोन्ही वाहनांच्या दर्शनी भागांचे नुकसान झाले आहे. ही घटना सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात एसटी मधील 2 प्रवासी जखमी झाले आहेत. मात्र इतर सर्व प्रवासी आणि चालक सुखरूप आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी अपघात स्थळी धाव घेतली.

उपलब्ध माहितीनुसार देवगड आगारातून सकाळी ६.४५ वाजता चालक ए.पी.धुमाळ व वाहक ए पी मुंडे, MH-13-7903 ही एसटी देवगडहुन अक्कलकोटला जात असताना हडपीड स्टँड नजीक असलेल्या वळणावर आली असता नांदगाव हुन देवगडच्या दिशेने येणारा Mh 07 1768 या गॅस वाहूतुक करणाऱ्या ट्रक आणि एसटी यामध्ये अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनांच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले आहे. अपघातग्रस्त एसटीमध्ये एकूण 17 प्रवासी होते. यातील एसटी मधील डायव्हर सीटच्या मागे बसलेल्या २ प्रवाशांना दुखापत झाली असून दोन्ही गाड्यांचे चालक व इतर 15 प्रवासी सुखरूप आहेत.

दरम्यान अपघातांच्या घटनेची माहिती मिळताच देवगड आगारातील वरिष्ठ अधिकारी तसेच देवगड पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळावर दाखल होत. अपघात स्थळाचा पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू होती. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी देवगड आगरातून देवगड अक्कलकोट मार्गावर दुपारी दुसरी एसटी सोडण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा