You are currently viewing ग्रामीण रुग्णालय, वेंगुर्ल्याच्या कामकाजात अनियमितता तसेच गरीब रुग्णांची हेळसांड..

ग्रामीण रुग्णालय, वेंगुर्ल्याच्या कामकाजात अनियमितता तसेच गरीब रुग्णांची हेळसांड..

आरोग्य विभागाच्या निर्देशाप्रमाणे रुग्णांना सोयी/सुविधा मिळत नसल्याने नागरिकांचा संताप..

 

वेंगुर्ला :

23 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता स्वामिनी मंगल कार्यालय, दाभोली नाका येथे ग्रामीण रुग्णालय, वेंगुर्ला मधून गरीब, गरजू रुग्णांना दर्जेदार सोयी व सुविधा मिळत नसल्याने  सुजाण नागरिक, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, सर्वपक्षीय पदाधिकारी व सदस्य तसेच रुग्णालय प्रशासन यांची संयुक्त सभा घेण्यात येणार आहे.

ग्रामीण रुग्णालयाचे नामांतर उपजिल्हा रुग्णालय झाल्यानंतर तमाम नागरिकांना आधी होत्या त्या सुविधा बऱ्या होत्या असे म्हणण्याची वेळ आलीय म्हणूनच प्रशासनाच्या अनागोंदी व भोंगळ कारभाराबाबत शहरातील सजग नागरिकांनी एकत्र येऊन हॉस्पिटलमध्ये सुधारणा होण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य उपसंचालक, कोल्हापूर यांच्याकडे दाद मागण्याचे निश्चित केले आहे.

वेंगुर्ला शहर तसेच तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी सदरील ज्वलंत विषयासाठी घेण्यात येणाऱ्या बैठकीस जातिनिशी हजर राहून सहकार्य करावे असे आवाहन आम्ही वेंगुर्लेकर या संस्थेतर्फे करण्यात आलेले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight + 1 =