‘आमचं घर आहे संकटात’, प्राजक्ता माळीची चाहत्यांना मदतीची विनंती

‘आमचं घर आहे संकटात’, प्राजक्ता माळीची चाहत्यांना मदतीची विनंती

मुंबई :

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी जितकी उत्तम कलाकार आहे. तितकीच उत्तम माणूससुद्धा आहे. प्राजक्ता नेहमीच सामाजिक बांधिलकी जपताना दिसून येत. सध्याच्या कोरोना महामारीमध्ये सुद्धा ती कार्यरत असल्याच  दिसून येत . प्राजक्ताने याच पार्श्वभूमीवर सर्व चाहत्यांना एक विनंती केली आहे.

नुकताच आपल्या सोशल मीडियावर अभिनेत्री प्राजक्ता माळीने एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये तिनं लिहिलं आहे, ‘मी सर्वांना विनंती करते की “आमचं घर” ही एक सामाजिक संस्था आहे, जी ठाण्यात राहणाऱ्या गरीब बांधवांसाठी, मुलांसाठी आणि ज्या वृद्धांना कोणीही आधार नाही त्यांना या संकट काळी मदत करण्याचे काम करत आहे. तरी “आमचं घर” ला त्यांचे हे समाज कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी मदत कराल अशी आशा आहे.मी माझ्यापरीने एक छोटीशी मदत करण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुम्हां सर्वांना विनंती करते की तुम्ही ही “आमचं घर” ला मदतीचा हात द्या ‘ अशा आशयाची पोस्ट तिने लिहिली आहे.

https://www.instagram.com/p/CPznBuIjCIP/

अनेक सामाजिक कार्यांमध्ये प्राजक्ता गुंतलेली दिसून येते. ती सोशल मीडियावर सुद्धा बरीच सक्रीय असते. प्राजक्ता सतत सामाजिक विषयांवर बिनधास्त आपलं मत मांडताना दिसून येत. त्यामुळेच ती समाजातील प्रत्येक व्यक्तीला आपलीशी वाटते.

http://www.ketto.org/fundraiser/contribute-and-share-kindness-to-feed-hungry-in-pandemic

प्रतिक्रिया व्यक्त करा