You are currently viewing ग्रामपंचायत हुमरमळा (वालावाल) येथील सरपंच ग्रामसेवक उपस्थित प्रतिनिधी यांचं निलंबन करून कारवाई करा….!

ग्रामपंचायत हुमरमळा (वालावाल) येथील सरपंच ग्रामसेवक उपस्थित प्रतिनिधी यांचं निलंबन करून कारवाई करा….!

अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येणार यास प्रशासन जबाबदार राहील…..

*कुडाळत सकल मराठा समाज आक्रमक*

कुडाळ :

महाराष्ट्र शासनाने दिनांक ६ जून हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिन शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यासाठी राज्य शासनाने निर्देश दिले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन अत्यंत  उत्साहात तोरण रांगोळी व सुंदर अशी गुढी उभारून साजरा करण्यात आला. शासनाने सर्व नियम व अटी लागू केल्या होत्या. तरी देखील कुडाळ तालुक्यातील ग्रामपंचायत हुमरमळा (वालावल) यांनी घालून दिलेल्या निदर्शनाचे पालन न करता. त्या ठिकाणी उपस्थित असलेले श्री.अतुल बंगे,सरपंच अर्चना अतुल बंगे,ग्रामसेवक अर्पणा पाटील,यांनी स्वतःच्या पायात बूट घालून “शिवस्वराज्य” गुढीची विटंबना केली आहे. तरी सदर ह्या व्यक्तीवर शासनाने येत्या ८ दिवसात कार्यवाही करून गुन्हा दाखला करावा. अन्यथा सकल मराठा समाज कुडाळच्या वतीने आंदोलन करण्यात येईल. त्यावेळी कुडाळ मध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी शासन जबाबदार राहील, असे निवेदन सकल मराठा समाज कुडाळच्या वतीने कुडाळ तहसीलदार, प्रांताधिकारी, गटविकास अधिकारी, कुडाळ पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. आज रोजी कुडाळ मध्ये मराठा समाज आक्रमक झालेला अनेकांना पहिला मिळाल येत्या दोन दिवसांत योग्य ती कार्यवाही नाही झाली. तर मराठा स्टाईल दाखवून देऊ, असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे. त्यावेळी उपस्थित मराठा समाजाचे भास्कर परब, मोहन सावत, संध्या तेरसे, सुबोध परब, राजा धुरी, दादा साईल, नागेश आईर, संग्राम सावंत, संदेश नाईक, रुपेश कानडे, रत्नाकर जोशी, बंड्या सावंत, शैलेश घोगळे, निलेश परब, प्रथमेश परब, राजवीर पाटील, केदार राऊळ, आदी मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा