You are currently viewing भाग्योदय लेखणीचा साहित्यिक मंच समूहाची गणेशोत्सव महास्पर्धा ठरली वर्षातील महत्त्वपूर्ण पाठशाला

भाग्योदय लेखणीचा साहित्यिक मंच समूहाची गणेशोत्सव महास्पर्धा ठरली वर्षातील महत्त्वपूर्ण पाठशाला

 

भाग्योदय लेखणीचा साहित्यिक मंच समूहाच्या वतीने समूह प्रशासक प्रदीप बडदे आणि संस्थापिका सौ.भाग्यश्री राकेश बागड यांनी गणेशोत्सवानिमित्त वाचन-लेखन संस्कृती जपण्याच्या उद्देशाने ‘राज्यस्तरीय ऑनलाईन काव्यलेखन महास्पर्धा’ आयोजित केली होती. महाराष्ट्रातील मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नाशिक, रायगड, रत्नागिरी, नागपूर, सोलापूर, चंद्रपूर, बीड, अहमदनगर, वर्धा, अकोला, धुळे, औरंगाबाद, तसेच गुजरातमधून अहमदाबाद, सुरत, वलसाड, वापी या जिल्ह्यांतून स्पर्धकांचा उस्फूर्त प्रतिसाद पाहता व्हाॅट्सएपच्या माध्यमातून ऑनलाईन स्वरूपात स्पर्धेसाठी कविता मागविण्यात आल्या होत्या.

दि.१६ आॅक्टोबर २०२२ रोजी शारदीय उत्सवाचे औचित्य साधून नव संकल्पना आणि नविन विचार अंमलात आणून स्पर्धेचा निकाल ऑनलाईन स्वरूपात जाहिर करण्यात आला. स्पर्धेसाठी सौ. अलका वढावकर आणि मा. हिरामण सोनवणे हे व्यासंगी तसेच उत्कृष्ट साहित्यिक परीक्षक म्हणून लाभले होते. त्यांचे काव्यसंग्रह व इतर साहित्य प्रकाशित असून अनेक साहित्यिक चळवळीत, नाट्य परिषद व सामाजिक संस्थांवर त्यांचे कार्य आपणास पहायला मिळते.

ऑनलाईन कार्यक्रमाचे संयोजक प्रदीप बडदे यांनी नवी मुंबई येथून केले असून प्रमुख आयोजक म्हणून त्यांचे विशेष सहकार्य आणि मार्गदर्शन समूहाला लाभले तसेच संस्थापिका सौ.भाग्यश्री राकेश बागड यांच्या सुनियोजित संकल्पनेतून कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. महास्पर्धा ही एकूण पाच फेऱ्यांमध्ये घेण्यात आली होती. परीक्षक म्हणून पहिल्या फेरीसाठी मयुर पालकर, द्वितीय फेरी- मालती धामणे, तृतीय फेरी- रेवती साळुंके, चतुर्थ फेरी- वर्षा वराडे फटकाळे यांनी परीक्षणाची सर्व सुत्रे सांभाळत चारही फेऱ्यांचे उत्तम परीक्षण केले. आता मात्र शेवटी प्रश्न उरला महाअंतिम फेरीचा.

स्पर्धेत सर्व स्पर्धकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून आपापल्या परीने उत्तम रचना लिहिण्याचा प्रयत्न केला. परंतु फेरी परीक्षण आणि विविध काव्यप्रकार यांमुळे एकूण ७५ स्पर्धकांमधून २२ स्पर्धक महाअंतिम फेरीसाठी पात्र ठरले. मा.अलका वढावकर आणि मा.हिरामण सोनवणे सर यांच्या उत्कृष्ट व चौकस परीक्षणातून स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला.
महाविजेते खालीलप्रमाणे:-
सर्वोत्कृष्ट – श्रीकांत शिरभाते, सुरत ;
उत्कृष्ट – सौ.दक्षा संखे, मुंबई ;

उपविजेते – शरयु पाम्पट्टीवार, सरोज गाजरे,
प्रतिभा पाटील, आशा नष्टे; मिलिंद कोथिंबीरे,
संपदा देशपांडे, शामला पंडित, मनिषा मानवतकर

अंतिम फेरीत उत्तम लिखाण करणारे कवी/कवयित्री:-
नीना देसाई, सुभद्रासुत आंधळे, चेतन मोरे,
सुचित्रा कुंचमवार, पी.जी.ठाकूर, ज्योती मोकल
संगीता पगारे, सोमेश कुलकर्णी, विनायक पाटील
विद्या ठवकर, दत्ताहरी कदम, सुधा संकपाळ.

स्पर्धा यशस्वी व्हावी याकरिता उत्तम ग्राफिक्सकार लाभले होते. डाॅ.शामल पाटील अग्रवाल, सोनी कानडे, अनिता आबनावे तसेच मयुर पालकर यांचे स्पर्धेच्या नियोजनात ग्राफिक्सकार म्हणून महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. सर्व सहभागी स्पर्धकांना, पाचही फेरीसाठी उत्कृष्ट परीक्षण केल्याबद्दल परीक्षकांना आणि अंतिम फेरीतील विजेत्या स्पर्धकांना आकर्षक ई-प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे स्पर्धेचे महाविजेता मा.श्रीकांत शिरभाते आणि महाविजेत्या मा.दक्षा संखे यांना समूहाच्या वतीने सन्मानचिन्ह घरपोच पोस्टाने पाठविण्यात येणार असल्याचे आयोजकांनी घोषित केले. अशाप्रकारे भाग्योदय लेखणीचा मंच समूहाची या वर्षभरातील ही एक महत्त्वपूर्ण काव्यलेखन महास्पर्धा मोठ्या दिमाखात संपन्न झाली होती.

 

Advertisement

*_कुडाळ शहरातील लक्ष्मी डेव्हलपर्स प्रकल्पात ग्राहकांना मिळणार खास “दसरा ऑफर”…_*💃

*💁‍♀️रजिस्ट्रेशन व स्टॅम्प ड्युटी माफ*🤗🤔

*🏬18 लाख 24 हजार मध्ये 1 बीएचके फ्लॅट तर 25 लाख 24 हजार 800/- मध्ये 2 बीएचके फ्लॅट उपलब्ध*

*लक्ष्मी डेव्हलपर्स*
*औदुंबर प्लाझा*

*🏬(सात मजली भव्य-दिव्य गृह प्रकल्प)🏬*

*👉कुडाळ नाबरवाडी, कुडाळ, MIDC Rd. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*👉आमची वैशिष्ट्ये:-*
*▪️कुडाळ बसस्थानकापासून फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर…🚶‍♀️*
*▪️फ्लॅट पासून रेल्वे स्टेशन अवघ्या 2 मिनिटांच्या अंतरावर…🛣️*
*▪️ साई मंदिर अवघ्या 2 मिनिटांच्या अंतरावर*
*▪️ निसर्ग रम्य परिसर*🌴🌴
*▪️प्रधान मंत्री आवास योजनेची सुविधा…🏠*
*▪️बँक कर्ज सुविधा उपलब्ध…💰*
*▪️24 तास पाण्याची सोय उपलब्ध…💧*
*▪️लिफ्ट स्टील पार्किंग उपलब्ध*🛗
*▪️प्रशस्त पार्किंगची सुविधा…*🚘

*_मग आता वाट कुणाची बघतायं…! 🤔 आजच या…!🏃‍♂️आणि ताबा घ्या…!_*🏚️

*🏬मोजकेच फ्लॅट शिल्लक…!*

🏡 *आमचा पत्ता:-* *लक्ष्मी डेव्हलपर्स*
*औदुंबर प्लाझा, कुडाळ नाबरवाडी, कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

📲 *संपर्क :-* *9404444578*
*9021410378*

*ऑफिस नं. 9637163129*

*Web link*

*————————————————
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (Notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
—————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज :*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर :*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल :*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क :*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा