You are currently viewing दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय पणदुर, प्रशालेत पाठ्यपुस्तकांचे वाटप….

दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय पणदुर, प्रशालेत पाठ्यपुस्तकांचे वाटप….

कुडाळ

दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय पणदूर तिठा या प्रशालेत सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्ट मुंबई कडून मिळालेल्या मोफत पाठ्यपुस्तकांचे चे वाटप  सोमवारी (दि. 27) रोजी करण्यात आले. या कार्यक्रमात कनिष्ठ महाविद्यालयात शिकणाऱ्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते मोफत पाठ्यपुस्तके प्रदान करण्यात आली.

या कार्यक्रमात स्वागत व प्रास्ताविक प्रा. संजय गावकर यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुवर्य अणावकर सर यांनी विद्यार्थ्यांनी उत्तरोत्तर आपली प्रगती करून शाळेचे व संस्थेचे नाव उज्वल करावे व शालेय शिस्तीचे विद्यार्थ्यांनी पालन करावे असे आवाहन केले. या कार्यक्रमासाठी प्रशालेचे प्र. मुख्याध्यापक एम. जी. कर्पे व जेष्ठ शिक्षक वालावकर सर तसेच प्रशालेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व 11 वी चे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सौ. एस. सी. सरवणकर मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा