You are currently viewing कवठी गावातील विरोधी पक्षाच्या महिला सरपंचांना आ. वैभव नाईक यांनी दिला सन्मान

कवठी गावातील विरोधी पक्षाच्या महिला सरपंचांना आ. वैभव नाईक यांनी दिला सन्मान

*कवठी गावातील विरोधी पक्षाच्या महिला सरपंचांना आ. वैभव नाईक यांनी दिला सन्मान*

*सरपंचांच्या हस्ते केले विकास कामाचे भूमिपूजन*

आमदार वैभव नाईक यांनी कवठी गावातील गावकरवाडी येथे साकव बांधण्यासाठी ४५ लाख रु. मंजूर केले असून या कामाचे भूमिपूजन विरोधी पक्षाच्या महिला सरपंच स्वाती करलकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. कवठी गावातील सरपंच विरोधी पक्षाच्या आहेत तर उपसरपंच सहित बहुसंख्य सदस्य शिवसेनेचे आहेत. सरपंच विरोधी पक्षाच्या असल्या तरी यानिमित्ताने महिलांना सन्मान देण्याचा आदर्श आ. वैभव नाईक यांनी घालून दिला आहे. सर्वांना सोबत घेऊन गावचा विकास करण्याच्या आ. वैभव नाईक यांच्या या कार्यप्रणालीबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

त्याचबरोबर आ. वैभव नाईक यांनी बजेट २०२०-२१ अंतर्गत कवठी अशांतवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे यासाठी २२ लाख रु. निधी मंजूर केला आहे. या कामाचे देखील भूमिपूजन करण्यात आले.
याप्रसंगी कवठी सरपंच स्वाती करलकर,उपसरपंच ऋतुजा खडपकर, माजी सरपंच रुपेश वाडयेकर, ग्रा. प. सदस्य नंदकिशोर वाडयेकर, ममता वाडयेकर, उपविभागप्रमुख मंगेश बांदेकर,माजी उपसरपंच अरुण परुळेकर,शाखा प्रमुख गोपाळ कवठकर,अमृता पार्सेकर,दिलीप परुळेकर,रमेश परुळेकर,महादेव पावसकर,राजन खोबरेकर, रवींद्र गोडकर,सुरेश कवठकर, शरद कवठकर,संतोष वाडयेकर,महेश वाडयेकर,लवू वाडयेकर,प्रशांत बांदेकर,अनिल चिंचकर,आनंद परुळेकर,दादा गुरव,एकनाथ बांदेकर, दीपक सांगवे,प्रवीण वाडयेकर,रुपेश खडपकर, दामोदर करलकर,मधुकर खडपकर,सुहास परुळेकर, गणपत शिरगावकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 1 =