You are currently viewing कणकवली शहरात चार ते पाच ठिकाणी घरफोडी

कणकवली शहरात चार ते पाच ठिकाणी घरफोडी

कणकवली

तालुक्यात मागील काही महिन्यांपासून चोरीचे सत्र सुरू आहे. दोन महिने पण पूर्ण झाले नसतील कणकवलीत चोरट्यानी तब्बल १० फ्लॅट फोडले होते. त्यानंतर त्यानंतर कणकवली बांधकरवाडी येथे देखील एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्यासह अजून एका व्यक्तीचा फ्लॅट फोडला होता. वस्तुस्थिती पाहता दहा ते बारा फ्लॅट चोरट्यांनी फोडले होते. त्यात असलेले आरोपी अद्यापही गजाआड झालेले नाहीत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फक्त चोरटे सराईत असल्याची माहिती देण्यात आली होती.

मात्र आता चोरट्यांनी कणकवली शहर टार्गेट केल असल्याचं चित्र आहे. कारण आरोपी पकडले जात नाहीत आणि त्यामुळे पुनःष चोरी करण्याचं धाडस या चोरट्यांकडून केलं जातं. शहरातील कणकनगर परिसरात मध्यरात्रीनंतर ४ ते ५ बंद घरे चोरट्यांनी फोडली. या घटनेमुळे शहरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यातील काही घर मालक कणकवलीत दाखल झाल्यानंतर एकूण किती ऐवज चोरीला गेला याची निश्‍चिती होणार आहे. कणकवली शहरात गेल्या वर्षभरात सातत्याने चोरीच्या घटना होत आहेत. त्यानंतर काल मध्यरात्री पुन्हा एकदा शहरात चोरट्यांनी धुमाकुळ घातला. यात अंकुश सावंत यांच्या बंगल्यातून चांदीचे दागिने तसेच इतर ऐवज लंपास झाला आहे.मात्र आता पोलिसांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलीस अधीक्षक स्वतःहून कणकवलीत दाखल होत आजपर्यंत झालेल्या चोऱ्यांबाबतचा आढावा घेतील का ?असा प्रश्न जनसामान्य नागरिकांमधून उमटत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा