You are currently viewing राज्यशासनाने निर्बंधात शिथीलता केली तरी माजगांव गाव पुर्णपणे “सील”

राज्यशासनाने निर्बंधात शिथीलता केली तरी माजगांव गाव पुर्णपणे “सील”

विनाकारण फिरणाऱ्यांवर राहणार प्रशासनाची कडक नजर.

सावंतवाडी

राज्य शासनाने आज पासून राज्यात काही शिथीलता केली आहे मात्र माजगांव मध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.माजगांव मध्ये दिवसेंदिवस वाढती कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेता माजगांव गाव पुर्णपणे सील करण्याचा निर्णय ग्रामपंचायत च्या वतीने घेण्यात आला आहे.

त्या निर्णयाची आजपासून अंमलबजावणी करण्यात आली आहे माजगांव गावच्या सर्व सीमा सील करण्यात आल्या आहेत.तसेच विनाकारण फिरणाऱ्यांची रँपिड केली जाणार आहे,माजगांव आजपासून पुर्णपणे बंद करण्यात आले आहे. या बंदला माजगांव गावच्या ग्रामस्थांचा सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा