You are currently viewing रेल्वे स्टेशन ते बांदा-सावंतवाडी जादा एसटी बस सोडण्याबाबत केसरकर समर्थकांचे एसटी प्रशासनाकडे निवेदन सादर 

रेल्वे स्टेशन ते बांदा-सावंतवाडी जादा एसटी बस सोडण्याबाबत केसरकर समर्थकांचे एसटी प्रशासनाकडे निवेदन सादर 

सावंतवाडी

गणेश चतुर्थीच्या काळात चाकरमान्यांची हेळसांड होवू नये, यासाठी सावंतवाडी व बांदा बस स्थानक ते रेल्वे स्टेशन अशा जादा गाड्या, एसटी बस सोडण्यात याव्यात, अशी मागणी केसरकर समर्थकांकडून एसटी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. याबाबत आज एसटीच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांनी मागणी केली. आता चाकरमानी मोठ्या प्रमाणात दाखल होत असल्यामुळे त्यांना वेळेत गाडी न मिळाल्यामुळे त्यांचे हाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याबाबतचा तात्काळ निर्णय घेण्यात यावा व अधिकच्या गाड्या सोडण्यात याव्यात, असे त्यांनी म्हटले आहे.

यावेळी आगार प्रमुख श्री.नरेंद्र बोधे, गजानन नाटेकर, संजय मडगावकर, दत्ताराम बांदेकर, मंगलदास देसाई, बापू कोठावळे, पांडुरंग बांदिवडेकर, एकनाथ हळदणकर, विश्वास घाग, सदाशिव कदम, नारायण उर्फ बबन राणे, अशोकराव दळवी, प्रकाश बिद्रे, जगन्नाथ गावडे, शैलेश मेस्त्री आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 1 =