पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडीत विविध कार्यक्रमांचे आयोजन…

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडीत विविध कार्यक्रमांचे आयोजन…

वैभववाडी :

२१ व्या शतकात स्वयंपूर्ण आणि आत्मनिर्भर भारताचे स्वप्न उराशी बाळगून त्यादृष्टीने वाटचाल करून जगासमोर आदर्श निर्माण करणारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्ताने देशभर भाजपाच्यावतीने सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. वैभववाडी तालुका भाजपाच्यावतीने यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती भाजपा तालुका अध्यक्ष नासीर काझी यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.

कार्यक्रमाची रुपरेषा खालीलप्रमाणे सोमवार दि. १४ सप्टेंबर रोजी सकाळी ११. वा. तालुका मुख्यालयातील शासकीय कार्यालय परिसरात स्वच्छ्ता मोहीम राबविणे. मंगळवार दि.१५ रोजी सकाळी ११. वा. तालुकास्तरीय कार्यालयात वृक्ष लागवड करणे, बुधवार दि.१६ रोजी सकाळी ११. वा. रक्तदान शिबीर. गुरुवार दि.१७ रोजी सायंकाळी ४. वा. तालुक्यातील कोव्हिड सेंटरमधील रुग्णांना फळवाटप आणि तालुका कार्यालयात केक कापून वाढदिवस साजरा करणे. शुक्रवार दि.१८ रोजी सकाळी ११. वा. कोकिसरे जि.प. मतदार संघात स्वच्छ्ता व वृक्षलागवड करणे, दुपारी ३. वा. पं.स.सभागृह येथे कोव्हिड योद्धा शिक्षकांचा सन्मान करणे, शनिवार दि. १९ रोजी सकाळी ११. वा. कोळपे आणि लोरे जि.प. मतदार संघात सकाळी ११. वा. स्वच्छ्ता व वृक्षलागवड करणे, रविवार दि. २० रोजी सकाळी ११. वा. माजी मंत्री रविंद्रजी चव्हाण यांचा वाढदिवसा निमित्त भाजपा महिला मोर्चामार्फत शासकीय रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप करणे आणि सेवा सप्ताह समारोप. या सेवा सप्ताह कार्यक्रमात तालुक्यातील सर्व भाजपा नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. असे आवाहन वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा