You are currently viewing निलेश राणे यांच्याकडून आंबेरी पुलाची पाहणी

निलेश राणे यांच्याकडून आंबेरी पुलाची पाहणी

*जोडरस्त्याचे काम तत्काळ सुरू करण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेश..*

 

कुडाळ :

सिंधुदुर्गात झालेल्या अतिवृष्टीमुळे कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्याला जोडणाऱ्या सर्वात महत्वाच्या निर्मला नदीवरील आंबेरी येथील जुन्या पुलाचा काही भाग खचून वाहतुक बंद झाली होती. सदरील ठिकाणी नवीन पूल उभारणी होऊन देखील जोडरस्ते व इतर काही अडचणींमुळे हा पूल वाहतुकीसाठी अद्याप खुला झालेला नाही. या पार्श्वभूमीवर आज भाजपा नेते निलेश राणे यांनी आज आंबेरी येथे भेट देऊन परिस्थितीची पहाणी केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारीही उपस्थित होते. पुलाच्या बांधकामासंदर्भात सर्व माहिती घेऊन नव्याने बांधकाम झालेला पूल वाहतुकीसाठी खुला व्हावा यासाठी जोडरस्त्यांची कामे तत्काळ पूर्ण करून वाहतुकीसाठी खुला करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसाहित कुडाळ मंडल श्री. संजय वेंगुर्लेकर, माजी सभापती श्री. मोहन सावंत, जिल्हा बँक संचालक श्री. प्रकाश मोर्ये, श्री. राजा धुरी, जोसेफ डान्टस, सचिन धुरी, दीपक काणेकर, कृष्णा सावंत, दीपक खरात आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा