You are currently viewing कास शाळेतील शिक्षकांचा ग्रामस्थांनी बदली निमित्ताने केला यथोचित सन्मान

कास शाळेतील शिक्षकांचा ग्रामस्थांनी बदली निमित्ताने केला यथोचित सन्मान

बांदा

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कास नंबर एक या शाळेतील कार्यतत्पर पदवीधर शिक्षक प्रकाश चंद्रकांत गावडे व उपक्रमशील शिक्षिका स्वाती पाटील या दोन शिक्षकांची प्रशासकीय बदली झाल्याने त्यांचा कास शाळेतील शिक्षक ,पालक, विद्यार्थी व ग्रामस्थ यांच्या वतीने सदिच्छा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.
कास गावचे सरपंच प्रवीण पंडित यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेला हा शुभेच्छा समारंभ अविस्मरणीय असा ठरला. प्रकाश गावडे व स्वाती पाटील यांनी गेली दहा वर्ष या शाळेत अध्यापनाचे पवित्र कार्य करत असताना समाज संपर्क राबवून शाळेचा कायापालट करण्यास सर्व शिक्षकांबरोबर या दोन शिक्षकांचा मोठा हातभार होता. विद्यार्थ्यांना सर्वगुण संपन्न बनवणे तसेच विविध स्पर्धात्मक परीक्षेत विद्यार्थ्यांना सुयश प्राप्त करण्यासाठी शिक्षकांनी घेतलेली मेहनत तसेच शतक महोत्सव साजरा करण्यासाठी अहोरात्र परिश्रम या शिक्षकांनी घेतले होते. शिक्षकांच्या केलेल्या कार्याचा सन्मान व्हावा यासाठी कास ग्रामस्थांच्या वतीने हा सन्मान सोहळा कास नंबर एक शाळेच्या पटांगणामध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बापू कासकर ,उपाध्यक्ष वृंदा पेडणेकर, पोलीस पाटील प्रशांत पंडित ,मुख्याध्यापिका स्वाती नाईक, प्रतिष्ठित नागरिक अरुण कुडके, रामचंद्र कुडके , अनिल पंडित, वर्षा गावडे,जे.डी.पाटील याचबरोबर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी स्वाती पाटील व प्रकाश गावडे यांना शाळेच्या वतीने मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला पालकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात भेटवस्तू देऊन कृतज्ञता व्यक्त केली यावेळी आपल्या लाडक्या शिक्षकांना विद्यार्थ्यांनी भेट कार्ड बनवून शुभेच्छा दिल्या यावेळी विद्यार्थी ग्रामस्थ व सहकारी शिक्षक भावुक झाले होते यावेळी सत्काराला उत्तर देताना स्वाती पाटील यांनी सांगितले की कास गावातील विद्यार्थी ग्रामस्थ यांनी दिलेली प्रेम कधीही विसरता येणार नाही या गावात कार्य करत असताना मिळालेले अनुभव व लोकांचा पाठिंबा नक्कीच प्रेरणादायी असा होता प्रकाश गावडे यांनी सांगितले की कास गावात काम करताना एक वेगळाच आनंद मिळत होता या शाळेतील विद्यार्थी पालक व ग्रामस्थ हे नेहमीच सहकार्य करणारे आहेत.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन पदवीधर शिक्षक महेश‌ पालव यांनी केले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी पदवीधर शिक्षिका गोठस्कर मॅडम, वैभवी सावंत, अनिल आडे याबरोबर ग्रामस्थ व पालकांनी विशेष परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा