You are currently viewing सत्ताधारी पालकमंत्र्यांनी करायला हवे ते विरोधी आमदार नितेश राणेंनी केले – डॉ. अमोल तेली

सत्ताधारी पालकमंत्र्यांनी करायला हवे ते विरोधी आमदार नितेश राणेंनी केले – डॉ. अमोल तेली

कोरोनामुक्त गाव संकल्पनेबाबत पद्मश्री पोपटराव पवार यांचे मार्गदर्शन लाभदायी

पक्षीय झेंडा बाजूला ठेवत नितेश राणेंचे काम आदर्शवत

देवगड

आमदार नितेश राणे यांनी हिवरे गावचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांच्याशी सिंधुदुर्गातील सरपंचांचा कोरोनामुक्त गाव ठेवण्यासंदर्भात ऑनलाइन मिटिंग च्या माध्यमातून संवाद घडवून आणला.

जे सत्ताधारी पालकमंत्री, शासनाने करायला हवे ते विरोधी आमदार असलेल्या नितेश राणे यांनी सिंधुदुर्गवासियांसाठी केल्याची प्रतिक्रिया भाजपा देवगड तालुकाध्यक्ष डॉ. अमोल तेली यांनी दिली. निसर्गसंपन्न असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड झोन मधून बाहेर काढण्यासाठी विरोधी पक्षाचे आमदार असूनही आमदार नितेश राणे यांनी हिवरे बाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांच्याशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरपंचांचा मार्गदर्शनपर संवाद घडवून आणला. सध्या कोरोनाच्या मगरमिठीतून सिंधुदुर्ग जिल्ह्याला सोडविण्यासाठी लोकसहभागाची नितांत गरज आहे. पद्मश्री पोपटराव पवार यांनी आपले गाव कोरोनामुक्त कसे ठेवले हे सिंधुदुर्गातील सरपंचाना सांगतानाच जिल्ह्यातील सरपंचाना कोरोना लढ्यात येत असलेल्या त्यांच्या समस्याविषयक उद्बोधक मार्गदर्शनही केले.

ही जबाबदारी खरे तर पालकमंत्री म्हणून उदय सामंत आणि राज्य शासनाची आहे. मात्र विरोधी पक्षाचा आमदार असलो तरी समस्त सिंधुदुर्गवासीय माझे कुटुंब आहे याच भावनेतून आमदार नितेश राणे यांनी आगामी काळात घ्यावयाची खबरदारी आणि कोरोनाशी लढा कसा द्यावा याबाबत पोपटराव पवार यांच्याशी जिल्ह्यातील सरपंच संवाद घडवून आणला. आमदार नितेश राणे हे आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून खऱ्या अर्थाने जिल्ह्याचे पालकत्व निभावत असल्याची प्रतिक्रिया देवगड भाजपा तालुकाध्यक्ष डॉ. अमोल तेली यांनी व्यक्त केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा