*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*चहाच्या कट्ट्यावर..जगणारी मांदियाळी*
आल्याची ..अनुभूती कधीकधी
चहासोबत..नाकीनऊ ठरते
सुखदुःखात सहभागी व्हावं तसं
एकमेकांच्या ह्दयांत पाहायला लावते..
ओरिजिनॅलटी कट्ट्याची टिकवायला
सभ्यतेचा मेकअप उतरावा लागतो
पाठीवर थाप मिळत नाही तोवर
व्हिलन अॅक्टला स्पेशल तडा पडतो
जगण्याचा उलगडणारा संघर्ष
कट्ट्यावर उघडा नागडा..होतो
इच्छाशक्तीची ह्दयस्पर्शी गाथा
शेवटी..चहाचं ..कपात बुडवतो
कट्ट्यावर जगणारी मांदियाळी
काकुळतीनं घोटाघोटात जगतात
गुंफणसुत्र..जोडणारे चहाचे कप
गुरूकुलात..व्यक्तिमत्व घडवतात
चहावालीमाणसं जपत जपत
कट्टा..अलौकिक जीवनपट घडवतो
प्रतिभा संस्कार हैसियत असो वा नसो
मृगजळाला जलमय करून टाकतो
वेळ हरवली तरी…चालेल..पण
चहावाली ….माणसं जपा
कट्ट्यावर..भक्ताला भक्तीरसात
एक कटिंग तरी…स्पेशल पाजा..
चहादिनानिमित्त खूप शुभेच्छा
बाबा ठाकूर
