*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री विद्या रानडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*विश्र्वास उडे*
विश्वास उडे देवावरचा
वाटतेअसे न्यायच कोठे
हवीहवीशी व्यक्ती जाते
जगनिर्माता आहे कोठे
आनंद नावे नाडकर्णी ते
आनंदाचे झाडच होते
जगातील हे प्रथितयशी
किती जणांचे तारक होते
दुःख शब्द जो अपुरा भासे
सदस्य घरचा गेला वाटे
अवचित घाला कसा घातला
विश्र्वनियंता नाही कोठे
विद्या रानडे
