You are currently viewing सावंतवाडीच्या आमदारांनी शिवसेना सोडली की काय

सावंतवाडीच्या आमदारांनी शिवसेना सोडली की काय

की मोठ्या रजेवर गेलेत शिवसेनेचे कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी जाहीर करावे ; महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सवाल

आमदार वैभव नाईक पुढील इतर मतदारसंघात फिरून लोकसभेची तयारी करत आहेत का?

सावंतवाडी :

सावंतवाडीच्या आमदारांनी शिवसेना सोडली की काय; की मोठ्या रजेवर गेलेत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी जाहीर करावे सावंतवाडी विधानसभेचे आमदार किती दिवस आजारी आहेत ते पण जनतेला सांगावे आमच्या आमदारांनी गणपती पण मुंबईत बसवले मतदारांना विसरले की काय

वैभव नाईक या मतदारसंघाचे प्रश्न ऐकायला येत असतील ते आपल्या मतदार संघात असलेले जिल्हा रुग्णालयातील प्रश्न, आणि रूग्णासोबत असलेल्या नातेवाईकांचे होत असलेले हाल, रुग्णांना मिळत असलेले जेवण, अस्वच्छता, शेर्ले येथील तालुका कोविंड सेंटरमध्ये साफ-सफाई न करणाऱ्या रुग्णांना त्रास देणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करतील काय की त्याला पाठीशी घालतील

जसे आपल्या मतदारसंघातील शिवसेनेच्या महिले वरती जो विनयभंग झाला तो प्रश्न सोडू शकत नाहीत, मुंबई-गोवा महामार्गावर तील खड्ड्यांचे प्रश्न सोडू शकत नाही, कुडाळ प्रांतांधिकारी यांची तक्रार करूनही चौकशी अहवाल क्लीन चीट येतो अशा अनेक अनेक प्रश्नावर सत्तेत असून पण प्रश्न सोडवू शकत नाहीत ते माजी पालकमंत्री यांच्या मतदार संघातील प्रश्न काय सोडवणार.

माजी पालकमंत्र्यांनी जाहीर केलेला चष्म्याचा कारखाना कधी सुरू होणार, नरेंद्र डोंगर मध्ये रोपवे कधी बसवणार, सावंतवाडी शहरातील अमेझॉन पार्कला पाच कोटी कधी मिळणार ,100000 सेट्पबॉक्स जनेतला कधी देणार, सावंतवाडीतील मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल कधी उभं राहणार, सिंधुदुर्ग जिल्ह्यात माजी पालकमंत्र्यांनी प्रवेशद्वाराचे उद्घाटन केले त्याचे काय झाले, मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल हे काय आयटी हब मधून किती जणांना नोकऱ्या मिळाल्या, आडाळी एम्. आय. डी. सी. चे काय झाले, की नगरपालीकेच्या स्टाॅल हटाव मोहिमेचे राजकारण करण्यासाठी शिवसेनेचे दोन जिल्हा प्रमुख सावंतवाडी येता आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरे आमदार वैभव नाईक देतील काय तसेच आमच्या आमदारांनी आपल्या कार्यालयावरील फलक काढले ते लावतील की कार्यालय बंद ठेवतील तेही जाहीर करावे असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे व शहरअध्यक्ष अाशिष सुभेदार यांनी केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

ten + 6 =