नाना पटोले यांचा वाढदिवस शेतकरी सन्मान दिवस म्हणून साजरा करणार – काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे

नाना पटोले यांचा वाढदिवस शेतकरी सन्मान दिवस म्हणून साजरा करणार – काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे

सावंतवाडी :

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांचा वाढदिवस संपूर्ण जिल्ह्यात शेतकरी सन्मान दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त शेतकरी गरीब बांधवांसाठी विविध उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहीती जिल्हाध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी दिली.

या कार्यक्रमानिमित्त शेतकरी कुटुंबाला खरिपाच्या पेरणीसाठी बी-बियाणे किंवा खतांचे वाटप करणार येणार असुन गरिब शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत देऊन त्यांना आधार देण्यात येणार आहे.

 

गरिब गरजू आणि कष्टकरी लोकांना गहू, तांदूळ, डाळी किंवा अन्नधान्य वाटप करणार केले जाणार आहे याशिवाय गावातील लोकांना लसीकरणासाठी प्रवृत्त करुन त्यांचे लसीकरण करण्यास मदत केली जाणार आहे. तसेच जिल्ह्यात वृक्षारोपण करणार असल्याचेही बाळा गावडे यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा