राष्ट्रवादीचे नेते दिखाऊपणा का करत आहेत ?- आशिष सुभेदार

राष्ट्रवादीचे नेते दिखाऊपणा का करत आहेत ?- आशिष सुभेदार

अभिजीत चितारी यांच्या बदली प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते दिखाऊपणा का करत आहेत ? असा सवाल मनसेचे शहरअध्यक्ष आशिष सुभेदार यांनी केला आहे.

सावंतवाडी / प्रतिनिधी :-

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे असे असताना सावंतवाडीत वैद्यकीय अधिकारी अभिजीत चितारी यांच्या बदली प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते दिखाऊपणा का करत आहेत ? असा सवाल मनसेचे शहरअध्यक्ष आशिष सुभेदार यांनी केला आहे.

तुमचे नेते सत्तेत आहेत आरोग्यमंत्री तुमचे आहेत त्यामुळे अशा प्रकारे नाहक दिखाऊपणा न करता तुमच्या नेत्यांकडून बदली रद्द करून घ्या जमत नसेल तर मनसेच्या माध्यमातून आम्ही प्रश्न सोडविण्याची तयारी आहे असा सल्ला सुद्धा सुभेदार यांनी दिला आहे याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे. श्री चितारी यांची जिल्हा रूग्णालयात बदली करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाकडून आज येथील उपजिल्हा रुग्णालय कार्यालयासमोर उपोषण करण्यात आलेले यावर श्री सुभेदार यांनी टीका केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा