You are currently viewing कुडाळ एमआयडीसी येथील नवीन ऑक्सिजन प्लांटचे शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

कुडाळ एमआयडीसी येथील नवीन ऑक्सिजन प्लांटचे शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

खा.विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांनी केली पाहणी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णालयांना ऑक्सिजन सिलेंडर पुरवठा करणाऱ्या युनाइटेड एअर गॅस प्रा.लि. कंपनीच्या माध्यमातून कुडाळ एमआयडीसी येथे नवीन लिक्विड ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आला आहे. या ऑक्सिजन प्लांटचे उदघाटन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवार ४ जून २०२१ रोजी सायं ४ वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे होणार आहे.याबाबत काल खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ एमआयडीसी येथे भेट देऊन ऑक्सिजन प्लांटची पाहणी केली. व कंपनीच्या अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
युनाइटेड एअर गॅस प्रा.लि. कंपनी हि कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी येथून ऑक्सिजन सिलेंडर रिफील करून जिल्ह्यातील रुग्णालयांना पुरवठा करत होती. मात्र जिल्ह्यात कोविडचे रुग्ण वाढत असल्याने ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये याकरिता पालकमंत्री उदय सामंत, खा. विनायक राऊत, आ.वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या प्रयत्नांतून सदर कंपनीने कुडाळ एमआयडीसी येथे लिक्विड ऑक्सिजन प्लांटची उभारणी युद्धपातळीवर अवघ्या १५ दिवसात केली आहे. कमीत कमी दिवसांत उभारण्यात आलेला राज्यातील हा पहिला ऑक्सिजन प्लांट असून ६ हजार लिटर एवढी ऑक्सिजन साठवण क्षमता आहे.यामध्ये ३० ड्यूरा सिलेंडर किंवा ६०० जंबो सिलेंडर रिफील होणार आहेत.यामुळे आवश्यक प्रमाणात जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरवठा होणार आहे.
यावेळी प्रांताधिकारी वंदना खरमाळे, जि. प. गटनेते नागेंद्र परब, डॉ. निलेश बानावलीकर, कंपनीचे संचालक श्री. नलावडे, आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा