You are currently viewing प्रशासनाचे होताय दुर्लक्ष..

प्रशासनाचे होताय दुर्लक्ष..

अत्यावश्यक सेवेत मोडत नसतानाही नियम धाब्यावर बसवून होत आहे परराज्यातून वाहतूक..

दोडामार्ग :

गेल्या काही दिवसांपासून दोडामार्ग बाजारपेठेतून कर्नाटक येथील ट्रक मधून मोठ्या प्रमाणात खनिज वाहतूक केली जात आहे. कळणे येथील मायंनिग मधून कळणे रेडी अशी होणारी खनिज वाहतूक बंद असताना ही वाहतूक होत आहे. ही वाहतूक अधिकृत आहे का? याची चौकशी व्हावी अशी मागणी केली जात आहे.

अत्यावश्यक सेवा नसताना हि परराज्यातील ट्रक चालक कसे काय महाराष्ट्र गोवा कर्नाटक असा प्रवास करत आहेत, असा प्रश्र्न पडला आहे. गेल्या काही दिवसांपासून दोडामार्ग तहसीलदार कार्यालय समोरून दरदिवशी पंधरा ते वीस ट्रक कळणे येथे खनिज भरुन याची वाहतूक दोडामार्ग गोवा अशी करत आहेत. यातील अनेक ट्रक चालक यांची कोविड टेस्ट केलेले प्रमाणपत्र देखील नसल्याचे उघडकीस आले आहे.

दोडामार्ग बाजारपेठेत अनेकांची रॅपीड टेस्ट केली जात आहे. परंतु खनिज वाहतूक, कोळसा, भुकटी वाहतूक करणारे ट्रक चालक यांच्यावर माञ कुठलीही कारवाई होताना दिसत नाही. कळणे मायंनिग मधून सुरू असलेली कळणे ते रेडी डंपर मधून होणारी खनिज वाहतूक गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. पण दोडामार्ग मार्गे मोठ्या प्रमाणात दहा चाकी ट्रक मधून सकाळी संध्याकाळी पंधरा ते वीस ट्रक दोडामार्ग येथून गोवा महाराष्ट्र चेक पोस्ट येथून गोवा राज्यात हे खनिज वाहतूक केली जात आहे.

कळणे येथून गोवा राज्यात होणारी खनिज वाहतूक ही अधिकृत आहे की कायदेशीर आहे, याची सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांनी चौकशी करावी. अत्यावश्यक सेवेत मोडत नसतानाही नियम धाब्यावर बसवून सुरू असलेली खनिज वाहतूक याची चौकशी व्हावी अशी मागणी केली जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 4 =