You are currently viewing बांदा-दोडामार्ग रस्ता खडीकरणाचे काम आठ दिवसात सुरू करणार; दीपक केसरकर…

बांदा-दोडामार्ग रस्ता खडीकरणाचे काम आठ दिवसात सुरू करणार; दीपक केसरकर…

सावंतवाडी

बांदा-दोडामार्ग या रस्त्याचे १५ मे पुर्वी खडीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेला निधी प्राप्त झाला असून आठ दिवसात सार्वजनिक बांधकाम विभागाला हे काम सुरू करण्याच्या सुचना दिल्या आहेत, अशी माहीती आमदार दीपक केसरकर यांनी आज येथे दिली.

भाजपाच्या पदाधिका-यांनी खुद्द पालकमंत्र्यांच्या विरोधात तिरडी आंदोलन काढण्याचा इशारा दिल्याने हा रस्ता चर्चेत आला होता. त्याला आज अंतीम मंजुरी देण्यात आली आहे. मात्र शंभर कोटी खर्च करून करण्यात येणारे रुंदीकरणाचे काम वर्षभरानंतर करण्यात येईल, असे श्री केसरकर यांनी सांगितले. आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा