You are currently viewing जागतिक पशुचिकित्सा दिवसाचे औचित्य साधून ऑडिओ कॉन्फरेन्सच्या माध्यमातून पशुपालकांना मार्गदर्शन…

जागतिक पशुचिकित्सा दिवसाचे औचित्य साधून ऑडिओ कॉन्फरेन्सच्या माध्यमातून पशुपालकांना मार्गदर्शन…

24 एप्रिल जागतिक पशुचिकित्सा दिवसाचे औचित्य साधून ऑडिओ कॉन्फरेन्सच्या माध्यमातून पशुपालकांना मार्गदर्शन-रिलायन्स फाउंडेशन, पशुसंवर्धन विभाग सिंधुदुर्ग व कृषी विज्ञान केंद्राच किर्लोस सिंधुदुर्ग उपक्रम

दि 24 एप्रिलला जागतिक पशुचिकित्सा दिन साजरा करत रिलायन्स फाउंडेशन, पशुसंवर्धन विभाग सिंधुदुर्ग व कृषी विज्ञान केंद्र किर्लोस सिंधुदुर्ग यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पशुपालकांसाठी ऑडिओ कॉन्फरेन्सच्या माध्यमातून मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला होता. सध्या कोरोना महामारी सर्वत्र पसरत असून कोणालाही घराच्या बाहेर निघण्यास सक्त मनाई आहे. त्यामुळे रिलायन्स फाउंडेशन, पशुसंवर्धन विभाग सिंधुदुर्ग व कृषी विज्ञान केंद्र सिंधुदुर्ग शेतकऱ्यांना व पशुपालकांना घरबसल्या कसे मार्गदर्शन करता येईल व त्यांना वेळोवेळी माहिती पोहोचविण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करत आहे. या कार्यक्रमामध्ये जनावरांना उद्भवणाऱ्या विविध समस्या, पशुसंवर्धन व्यवस्थापकनामध्ये लसीकरणाचे महत्व, विविध शासकीय योजना यावर डॉ. विवेक ढेकणे , पशुधन विकास अधिकारी , देवगड यांनी मार्गदर्शन केले. जनावरांची उन्हाळ्यामध्ये काळजी कशी घ्यावी? गोचीड निर्मूलन कसे करावे, त्यांना आहार कासद्यावा? खुराक कशाप्रकारे द्यावा? यांचे मार्गदर्शन डॉ. तुषार वेर्लेकर, पशुधन विकास अधिकारी. मालवण यांनी केले. कुक्कुट पालन व व्यवस्थापन याबद्दल मार्गदर्शन डॉ. के. वी. देसाई, पशुतज्ञ्, कृषी विज्ञान केंद्र किर्लोस मालवण सिंधुदुर्ग यांनी केले.कार्यक्रमध्ये महिला आर्थिक विकास महामंडळ सिंधुदुर्गचे जिल्हा समन्व्यक श्री.नितीन काळे यांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे आयोजन रिलायन्स फाउंडेशनचे जिल्हा व्यवस्थापक राजेश कांबळे यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रम सहाय्यक गणपत गावडे यांनी प्रयत्न केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 1 =