पोस्टऑफिसच्या विशेष योजनांमध्ये ‘नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट योजना’

पोस्टऑफिसच्या विशेष योजनांमध्ये ‘नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट योजना’

पोस्टऑफिसच्या विशेष योजनांमध्ये ‘नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट योजना’…. करा गुंतवणूक!*

नवी दिल्ली :

भारताची आर्थिक परिस्थिती सध्या कोरोना संकटकाळात मोठ्या प्रमाणात ढासळली आहे. अशा संकटकाळात ज्यांना गुंतवणूक करायची आहे, त्यांना इंडियन पोस्टाने एक चांगला पर्याय आणला आहे. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर पोस्टऑफिस मधील छोट्या बचत (Small Savings Scheme) योजनांमध्ये गुंतवणूक करणे योग्य पर्याय होऊ शकतो. ग्राहकांना या पोस्टऑफिस मधील गुंतवणूकीने मोठा फायदा होईल. या योजनेत गुंतवणूक केल्याने तुम्हाला एफडीच्या तुलनेत चांगले व्याज मिळेल. तसेच ही योजना गुंतवणूकदारांसाठी सुरक्षितही आहे. या योजनेमधील रकमेवर सार्वभौम हमीदेखील (Sovereign Guarantee) मिळत आहे.

पोस्ट ऑफिसच्या सध्याच्या विशेष योजनांमध्ये ‘नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट’ ही योजना समाविष्ट आहे. यात गुंतवणूकदारांना एफडी पेक्षा चांगले व्याज मिळत आहे. या एनएससी (नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट) योजनेमध्ये वार्षिक ६.८ टक्के व्याजदर सध्या मिळत असून, या योजनेचा कालावधी पाच वर्षाचा आहे. यात महत्त्वाचे म्हणजे याची मॅच्युरिटी पूर्ण झाल्यावरही आणखीन ५ वर्षांकरिता याच्या कालावधीत वाढ करता येऊ शकते. या योजनेत कोणीही गुंतवणूक करू शकतो.
ग्राहकांना १०० रुपये, ५०० रुपये, १००० रुपये, ५००० रुपये आणि १०००० रुपयांत सध्या ही ‘राष्ट्रीय बचत सर्टिफिकेट’ उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या किमतीचे कितीही एनएससी सर्टिफिकेट खरेदी करून ग्राहक या योजनेत गुंतवणूक करू शकतात. कमीत कमी १०० रुपयाची गुंतवणूकही या योजनेत करता येऊ शकते. जर गुंतवणूकदाराने १५ लाखांची गुंतवणूक केली तर त्याचे 6.8 टक्के व्याजदराने ही रक्कम २०.८५ लाख होईल. तुमची गुंतवणूक १५ लाखाची असल्याने तुम्हाला होणारा फायदा ६ लाखांचा असेल. तसेच इन्कम टॅक्स कायदा १९६१ सेक्शन ८०-सी अंतर्गत एनसीसीमध्ये वार्षिक १.५ लाख पर्यंतच्या गुंतवणूकीवर टॅक्समध्ये सूटही मिळेल.

प्रतिक्रिया व्यक्त करा