महिलांचे प्रतिनिधीत्व सर्वमान्य व्हावे : प्रा.डॉ.प्रेमचंद….

महिलांचे प्रतिनिधीत्व सर्वमान्य व्हावे : प्रा.डॉ.प्रेमचंद….

वेंगुर्ला :

भारतीय महिलांचे हक्कांसंबंधी जनजागृती होणे आवश्यक असून यासाठी महाविद्यालये आणि विद्यापिठेही महत्त्वाची केंद्रे आहेत. महिला आरक्षणापेक्षा महिलांचे प्रतिनिधित्व सर्वमान्य व्हावे, असे प्रतिपादन नॅशनल लॉ युनिर्व्हसिटी दिल्ली येथील प्रा. डॉ. प्रेमचंद यांनी कार्यशाळेत बोलताना केले.

वेंगुर्ला येथील बॅ.खर्डेकर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना, महिला विकास कक्ष व ग्रामीण विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वुमन्स राईटस् इन इंडिया‘ या विषयावर एकदिवशीय ऑनलाईन राष्ट्रीय कार्यशाळा घेण्यात आली.

या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना डॉ. प्रेमचंद यांनी महिलांचे आयुष्य व वैयक्तिक स्वातंत्र्य, विनामूल्य कायदेशीर सहकार्य, आरोग्यसोयींविषयीचे अधिकार, अंतर्गत तक्रार समिती, महाराष्ट्रातील महिलां विषयक योजना आदींबाबत माहिती दिली. या कार्यक्रमात प्राचार्य डॉ.विलास देऊलकर, राष्ट्रीय सेवा योजना मुंबई विद्यापिठाचे समन्वयक प्रा.सुधीर पुराणिक, कोल्हापूर विभागाचे विभागीय समन्वयक प्रा.राजेंद्र कोळेकर, सिधुदुर्ग जिल्हा समन्वयक प्रा.वसिम सय्यद, सिधुदुर्ग कनिष्ठ विभागाचे जिल्हा समन्वयक प्रा.कांतिलाल जाधवर यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.मनिषा मुजुमदार, सूत्रसंचालन डॉ. धनश्री पाटील यांनी तर आभार प्रा. विवेक चव्हाण यांनी मानले. कार्यशाळेची तांत्रिक जबबादारी प्रा.विनोद पवार व कु. वेदश्री चव्हाण यांनी सांभाळली. कार्यशाळा यशस्वीतेसाठी प्रा. विरेंद्र देसाई, प्रा. आनंद बांदेकर, विधाता सावंत यांनी सहकार्य केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा