You are currently viewing कोवॅक्सीन लसीचे लसीकरण सत्र

कोवॅक्सीन लसीचे लसीकरण सत्र

 जिल्ह्यात कोवॅक्सीन लसीचे लसीकरण सत्र शनिवार दि. 29 मे रोजी आयोजित करण्यात आले आहे. सदरील कोवॅक्सीन लस ही ज्या नागरिकांनी कोवॅक्सीन लसीचा पहिला डोस घेतलेला आहे. त्यांना दुसरा डोस घेण्याकरिताच राखीव आहे. सदरील लसीकरण सत्रामध्ये 45 वर्षांवरील नागरिकांना प्राधान्याने दुसरा डोस दिला जाणार आहे. आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर्स यापैकी ज्यांनी पहिला डोस घेतला आहे त्यांनाही यावेळी दुसरा डोस दिला जाणार आहे.

            या लसीकरण सत्रासाठी लसीकरण केंद्रांवर पुढील प्रमाणे लस उपलब्ध असणार आहे. देवगड तालुक्यातील इळिये – 120, कणकवली तालुक्यातील कासार्डे – 120, फोंडा – 60, मालवण तालुक्यात आचरा -60, चौके – 120, कुडाळ तालुक्यात पणदूर – 60, माणगांव – 120, वेंगुर्ला तालुक्यात परुळा – 120, आडेली – 120, रेडी – 120, सावंतवाडी तालुक्यात निरवडे – 60, बांदा 120, दोडामार्ग तालुक्यात भेडशी 120, तळकट – 120 असे एकूण 1 हजार 440 डोस उपलब्ध असणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा