You are currently viewing केंद्रीय मंत्रिमंडळात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची वर्णी

केंद्रीय मंत्रिमंडळात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची वर्णी

*शपथविधीनंतर कोकणात जल्लोष*

 महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांना भाजपच्या माध्यमातून केंद्रीय मंत्रीपद देण्यात आले आहे. आज झालेल्या शपथविधीनंतर त्यांच्या कडे केंद्रीय कॅबिनेट मंत्री पदाचा कार्यभार देण्यात आला आहे. त्यांनी शपथ घेतल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांच्या समर्थकांनी जोरदार जल्लोष केला.

राणेंना मंत्रिपद मिळाल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात व पर्यायाने कोकणात भाजप बळकट होण्यास फायदा होणार आहे.

श्री.राणे यांना गेले काही दिवस केंद्रात मंत्रिपद मिळेल अशी चर्चा होती. मोदींच्या मंत्रिमंडळात त्यांना अखेर संधी देण्यात आली आहे. आगामी काळात होणाऱ्या निवडणुका लक्षात घेता या ठिकाणी जिल्ह्यात बळकटी मिळण्यासाठी भाजपकडून राणे यांचे हात बळकट केले गेले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 + fourteen =