You are currently viewing एव्हढेच मला कळले होते.

एव्हढेच मला कळले होते.

संकटांनी पावलोपावली,
क्षणाक्षणाला छळलं होतं.
जीवन नसतं साधं सोपं,
एव्हढेच मला कळलं होतं.

रस्तोरस्ती चालताना माझं,
खड्डयांनी पाऊल गिळलं होतं.
खाचखळगे जीवनाचा भाग,
एव्हढेच मला कळलं होतं.

आयुष्याच्या पूर्वार्धात मला,
सुख चैन सारं मिळालं होतं.
आव्हानांमध्ये भविष्य अडकलं,
एव्हढेच मला कळलं होतं.

यशाची शिडी सहजच चढलो,
पण सापाने तिथेच गिळलं होतं.
सापशिडीचा खेळ बेभरवशाचा,
एव्हढेच मला कळलं होतं.

अडचणी पाहून जीवनातल्या,
माझे पाऊल मागे वळलं होतं.
जगण्यासाठी हवा आत्मविश्वास,
एव्हढेच मला कळलं होतं.

(दिपी)✒️
दीपक पटेकर, सिंधुदुर्ग.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen + six =