You are currently viewing केशरी शिधापत्रिका धारकांना रास्तभावाने अन्नधान्याच वाटप

केशरी शिधापत्रिका धारकांना रास्तभावाने अन्नधान्याच वाटप

सिंधुदुर्गनगरी

केशरी शिधापत्रिका धारकांना प्रतिमाह 1 किलो गहू व 1 किलो तांदूळ सवलतीच्या दराने वाटप करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. त्याप्रमाणे जिल्ह्‌यातील रास्तभाव दुकानांमध्ये केशरी कार्ड धारकांना शिधावाटप करण्यात येत आहे.   

          कोरोना विषाणूचा प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत शेतकरी योजनेअंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांना माहे मे 2020 ते ऑगस्ट 2020 या 4 महिन्यांच्या कालावधीकरिता देण्यात आलेल्या अन्नधान्यापैकी वितरणाअभावी शिल्लक असलेल्या अन्नधान्याचे वितरण माहे जून 2021 मध्ये करणेच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.

        जिल्हयातील एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांनी अन्नधान्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गिते, यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 + seven =