You are currently viewing मॉडेलिंग स्पर्धेत नील बांदेकर प्रथम

मॉडेलिंग स्पर्धेत नील बांदेकर प्रथम

सावंतवाडी

किडस मॉडेलिंग कुडाळ आयोजित सिंधुदुर्ग बेस्ट मॉडेल या आगळ्यावेगळ्या स्पर्धेत बांदा केंद्र शाळेचा विद्यार्थी
नील नितीन बांदेकर याने प्रथम क्रमांक पटकावला .

सदर स्पर्धा १४ वर्षाखालील सर्व मुलामुलींसाठी खुली होती. स्पर्धेत विद्यार्थ्यांचा स्टायलिश फोटो, त्यांचे लुक, तसेच भाषण शैली यावर निवड केली गेली. नीलने आजवर अनेक स्पर्धांमध्ये विविध प्रकारचे यश संपादन केलेले आहे .

या वेगळ्या धाटणीच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून त्याने आपले अष्टपैलू व्यक्तिमत्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. सदर स्पर्धेचे आयोजन शेखर सातोस्कर आणि कोरिओग्राफर रवी कुडाळकर यांनी केले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − 17 =