You are currently viewing सावंतवाडीत स्वरांजली गायन मैफलीचे आयोजन 21 रोजी

सावंतवाडीत स्वरांजली गायन मैफलीचे आयोजन 21 रोजी

सावंतवाडीत स्वरांजली गायन मैफलीचे आयोजन 21 रोजी

सावंतवाडी :

श्री सद्गुरू संगीत कला व सांस्कृतिक मंडळ, सावंतवाडी, अभिनव संगीत विद्यालय व सावंतवाडी संगीत मित्रमंडळ आणि सुरश्री संगीत विद्यालय, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने पं. बबनराव हळदणकर यांचे शिष्य आग्रा घराण्याचे ज्येष्ठ गायक कै. उमेश दत्ताराम मेस्त्री यांना श्रद्धांजली व त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ ‘स्वरांजली’ या शास्त्रीय – उपशास्त्रीय गायन मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. किराणा घराण्याचे ख्यातनाम गायक व पं.श्रीकांत देशपांडे यांचे शिष्य पं.संजय गरुड, पुणे या कार्यक्रमात सादरीकरण करणार आहेत. शुक्रवार दि.२१ जुलै रोजी सायंकाळी ठीक ६ वाजता श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा