You are currently viewing अत्यावश्यक सेवेत नसलेल्या दुकानांना ठोकले टाळे..

अत्यावश्यक सेवेत नसलेल्या दुकानांना ठोकले टाळे..

वाभवे वैभववाडी नगरपंचायतचे मुख्याधिकारी सुरज कांबळे यांची कारवाई.

वैभववाडी
जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर सकाळी ९ ते ११ यावेळेत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले होते. तरी देखील वैभववाडी शहरात या आदेशाचे उल्लंघन होताना दिसून येत होते. यावर मुख्याधिकारी सुरज कांबळे यांनी संबंधित दुकानदारांना दुकाने बंद ठेवण्या बाबत सुचना दिल्या होत्या. तरी देखील आज मंगळवार दि. २५ मे २०२१ रोजी वैभववाडी शहरात अत्यावश्यक सेवा वगळता काही दुकाने चालू असल्याचे नगरपंचायत मुख्याधिकारी सुरज कांबळे यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्या दुकानांना मुख्याधिकारी सुरज कांबळे यांनी टाळे ठोकत नगरपंचायत प्रशासना मार्फत कारवाई केली.
यावेळी वाभवे-वैभववाडी चे मुख्याधिकारी सुरज कांबळे, लिपिक शांताराम पवार, सचिन माईणकर, शिपाई मधुकर इंदप, सुनिल निकम इत्यादी कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × four =