You are currently viewing कोरोना-योद्धा आहेत खरे सामाजिक आदर्श : कोश्यारी

कोरोना-योद्धा आहेत खरे सामाजिक आदर्श : कोश्यारी

आयएमएफच्या कार्यक्रमात राज्यपालांनी केला कोरोना वॉरियर्सचा गौरव

मुंबई –

‘कोरोना संकटाच्या ज्या विकट काळात माणुसकीला खरोखर मदतीची गरज होती, त्यावेळी अपेक्षित असलेली अनेक सामर्थ्यवान लोकं स्वत:चा जीव सावरत आपापल्या घरात लपून बसली होती, पण अशा गंभीर व विकट परिस्थितीतही काही समाजसेवी संघटनांना आपल्या सामाजिक जबाबदारीचे भान आवर्जून राहिले व आपले प्राण पणास लावून या संघटनांची लोकं गोरगरिब-गरजूंच्या मदतीसाठी पुढे सरसावली, त्यांनी या कामात सरकार व प्रशासनाचे खांद्याशी खांदा लावून सहकार्य केले. आपली सामाजिक भूमिका प्रामाणिकपणे बजावणा-या हिच व्यक्ती कोरोना योद्धा असून ते खरे सामाजिक आदर्श आहेत ‘, असे प्रतिपादन इंटरनेशनल मारवाडी फेडरेशन (आयएमएफ) च्या वतीने राजभवनाच्या मलबार हिल्स बँक्वेट हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कोरोना वॉरियर्सच्या सन्मान सोहळ्यात महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम भगतसिंह कोश्यारी यांनी केले. कोश्यारी हे कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणेपदी होते आणि सुप्रसिद्ध विनोदी कवी-टिव्ही मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम अभिनेते शैलेश लोढा यांची याप्रसंगी विशेष पाहुणे म्हणून उपस्थिती होती.

फेडरेशनच्या अध्यक्षा सुमन आर अग्रवाल यांच्या संयोजकत्वामध्ये आयोजित या कार्यक्रमास कोरोनाकाळात लोकसेवेसाठी स्वत:ला झोकून देणा-या कोरोना वॉरियर्सचे राज्यपालांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आले. कोश्यारींच्या हस्ते सन्मानित करण्यात आलेल्या या कोरोना योद्धांमध्ये परमार्थ सेवा समितीचे चेअरमन-उद्योगपती लक्ष्मीनारायण बियाणी, महाराष्ट्र पोलिस दलाचे महानिरीक्षक व नावाजलेले गझलकर कैसर खालिद, डॉ. बी.एल.चित्लांगिया, चित्रपट अभिनेते दीपक तिजोरी, धर्मराज फाऊंडेशनचे निलेश चौधरी, अखिल भारतीय अग्रवाल संमेलनाचे राष्ट्रिय उपसरचिटणीस डॉ. राजेंद्र अग्रवाल, रमेश गोयंका इत्यादींचा समावेश होता.

मानव जातीसह संपूर्ण जगातील महत्वाच्या अनेक यंत्रणांची नासधूस करणा-या जागतिक साथीच्या कोरोना आजारामुळे उद्भवलेल्या बिकट परिस्थितीत लोकांना खाऊ, धान्य, तेल, मसाले, साबणं इत्यादि पासून ते दररोजच्या वापरातील गरजेच्या वस्तूंच्या पुरवठा व लोकांना मोफत औषधांच्या वाटपात योग्यपणे आपल्या सामाजिक भूमिका बजावणा-या इंटरनेशनल मारवाडी फेडरेशनच्या कार्यांचे या प्रसंगी आपल्या भाषणात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कौतुक केले. १९८८ सालापासून कार्यरत असलेल्या या धर्मादाय संघटनेनी लोकहिताच्या उद्देशाने जगभर अनेक सर्जनशील कामं केली आहे. सौ.सुमन आर अग्रवाल या सुप्रसिद्ध महिला हक्क कार्यकर्त्या असून त्यांच्या नेतृत्वाखाली जवळपास गेल्या २० वर्षापासून सामाजिक क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत असलेल्या या संघटनेनी केवळ मुंबई-ठाण्यासह संपूर्ण महाराष्ट्र व देशभरात नव्हे तर जगभरात विविध ठिकाणी बंधु-भाव आणि सहकार्याच्या भावनेला चालना देण्यासाठी लोकांमध्ये ख-या सामाजिकतेला वाव मिळाली पाहिजे व त्यासाठी संस्थेच्या वतीने ठिकठिकाणी सातत्याने सेवाभावी,धर्मादाय, सांस्कृतिक, शैक्षणिक, वैद्यकीय, आध्यात्मिक इत्यादी मूलभूत विषयांवर विविध प्रकारच्या मोहिमा राबविल्या जात आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 5 =