You are currently viewing खजिना

खजिना

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

“खजिना “नावाचं सर्वांगसुंदर बालनाट्य काल पुण्यात पाहिलं. तुमच्याच घरात दडलेल्या अनोख्या खजिन्याची त्यात मुलांना करून दिलेय. नाटकाच्या शेवटी तुम्हीही तुमच्या घरातील अशा खजिन्याची ओळख लोकांना करून द्या अशी विनंती केलेय. त्यामुळे मीही तसा प्रयत्न केलाय.

 

*खजिना*

—————————–

 

काळोखी या वाड्यामधला डुगडुगता जिना

दडला आहे तिथे अनोखा मौल्यवान खजिना

 

गोट्या, भवरे, फणेरपेटी, जरी बुट्टीची टोपी

जिर्णशिर्णश्या चित्रांमधुनी रास खेळत्या गोपी

भातुकलीचा खेळ आणखी रंगीबेरंगी पिना

दडला आहे तिथे अनोखा मौल्यवान खजिना

 

अजून आहे ताठ मानेने इथे गांधींचा चरखा

बुलेटिनाचे यंत्र पाहुनी हरखून जातो नवखा

शूरविरांच्या स्पर्शाचा त्यावर जडला मिना

दडला आहे तिथे अनोखा मौल्यवान खजिना

 

जुन्या पत्रामधून धागा चळवळीचा संपडतो

त्यास वाचता अजून काटा अंगावर फुलतो

इतिहासाचा आम्हास दावी लखलखता ऐना

दडला आहे तिथे अनोखा मौल्यवान खजिना

 

श्रीनिवास गडकरी

रोहा पेण पुणे

9130861304

@ सर्व हक्क सुरक्षित

11.03.2024

नाटकाच्या प्रमोशन साठी viral करायला हरकत नाही

प्रतिक्रिया व्यक्त करा