You are currently viewing आपल्या मतदारसंघात लोक पाण्यासाठी तळमळत होते तेव्हा जि.प. सदस्य खोबरेकर कुठे “हरी हरी” करत बसले होते?

आपल्या मतदारसंघात लोक पाण्यासाठी तळमळत होते तेव्हा जि.प. सदस्य खोबरेकर कुठे “हरी हरी” करत बसले होते?

निलेश राणेंच्या येण्याने शिवसेनेच्या “वैभवा”ला उतरती कळा लागणार हे लक्षात आल्यानेच हा जळफळाट!

: भाजपा युवा मोर्चा सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष राजवीर पाटील यांचा पलटवार

तौक्ते चक्रीवादळ येऊन आठ दिवस उलटून गेले, आमदार खासदार येऊन बसले तरीही आपल्या मतदारसंघातील जनतेचा पाण्याचा प्रश्न जे जिप सदस्य खोबरेकर सोडवू शकले नाहीत, त्यांनी माजी खासदार आणि भाजपा नेते निलेशजी राणे यांच्यावर केलेली टीका कोत्या मनाचे लक्षण आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तिथला दौराच रद्द करत तुमची किंमत आधीच दाखवली आहे. तुमचे आमदार, खासदार आणि मुख्यमंत्र्यांची मदत यायच्या आधी माजी खासदार आणि भाजपा नेते निलेशजी राणे “फक्त भेट नाही, तर मदत थेट” म्हणत देवबागला पोहोचले याचा जाळ हरी खोबरेकरना लागला हे समजण्यासारखे आहे. तुमच्या मतदारसंघातील जनतेला मदत करण्यासाठी निलेश राणेंना तिथे पोहोचावे लागते, याची खरेतर तुमच्यासकट आमदार वैभव नाईक यांनाही लाज वाटायला हवी होती. तुमच्या मतदारसंघात आघाडी सरकारच्या मंत्र्यांना जनतेने रस्त्यावर रिकाम्या पाण्याचे हांडे ठेऊन अडवले, यावर खरेतर तुम्ही अपयश मानून घरात बसायला हवे होते. पण एकूणच शिवसेनेची अवस्था सध्या “गिरे तो भी” अशीच आहे, त्यामुळे तुम्हाला वेगळा दोष देण्यात अर्थ नाही.जनतेच्या आस्थेबाबत तुम्ही बोलावे यासारखा दुसरा विनोद नाही. आठ दिवस जनता वीज, पाणी, अन्नधान्य, निवाऱ्याच्या अडचणी घेऊन व्याकुळ होती, अशा स्थितीत वास्तविक तुम्ही निलेशजी राणे यांचे आभार मानायला हवे होते.तुमच्यासारखी सरकारी मदतीवर राजकारण करायची सवय राणेंच्या रक्तात नाही, त्यांनी स्वखर्चाने आणि आपलेपणाने अडचणीतल्या लोकांना नेहमीप्रमाणेच यावेळीही मदत केली आहे. दुसरीकडे, तुमचे मुख्यमंत्री मासे खाऊन गेले तरी या जनतेवर आज ही दुर्दैवी वेळ का आली, आमदार वैभव नाईक गेले आठ दिवस नेमके काय पिंजत बसले होते, हे प्रश्न जनतेला पडले आहेत, आणि त्याची उत्तरे लोक भविष्यात नक्की शोधून दाखवतील. सत्ता असूनही तुमच्या आमदार खासदारांचे आणि पालकमंत्र्यांचे काय वजन आहे, हे नियोजित दौरे रद्द करत मुख्यमंत्र्यांनी तीन तासातच तुम्हाला टाटा-बायबाय करून दाखवून दिले आहे. तेव्हा वाहून गेलेली हौदभर लाज लपवायला निलेश राणेंवर टिकेचा जुनाच प्रयोग आता शिळा झाला. त्यापेक्षा दंडाच्या बेटकुळ्या फुगवत हिंमत दाखवायचीच असेल, तर देवबागमध्ये फिरून लोक काय म्हणतात ते ऐकून आमदार वैभव नाईक यांना तोंडावर ऐकवण्याची हिंमत दाखवा, असे आव्हान युवा मोर्चा सोशल मीडियाचे राजवीर पाटील यांनी दिले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen + 19 =