राजकीय पुढारी अडकलेत जमीन व्यवहारांच्या वादात….

सालढाणा प्रॉपर्टीचे गौडबंगाल काय?

राजकीय पदांचा उपयोग करून काही राजकीय पदाधिकारी अनेकांच्या प्रॉपर्टी हेरून त्यांना गडगंज पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या प्रॉपर्टी अखत्यार पत्र करून स्वतःच्या ताब्यात घेतात किंवा बाहेरच्या बाहेर विक्री करून मूळ मालकांच्या तोंडाला पाने पुसतात.
जमीन मालक स्वतःची प्रॉपर्टी विकून सुद्धा जेवढे पैसे कमावत नाहीत त्याच्या चौपट पैसे जमिनीचे फसवाफसवीचे व्यवहार करणारे अच्छेदिन आणणारे राजकारणी करत आहेत. सावंतवाडी शहरापासून नजीक असलेल्या चराठे येथील सालढाणा यांच्या प्रॉपर्टीचे गौडबंगाल काय? हा सुद्धा असाच एक निरुत्तर राहिलेला प्रश्न असून या जमीन व्यवहार करणाऱ्या अच्छेदिन वाल्या राजकारणी नेत्याच्या व्यवहारात एका पत्रकाराने मध्यस्थी केल्याने सालढाणा कुटुंबीय अडचणीत आले आहे. परंतु कितीही फसवणूक केली तरी अच्छेदिन वाल्या नेत्यास आसमान दाखवून न्याय मिळविण्यासाठी सालढाणा कुटुंबीय खंबीर आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा