You are currently viewing लिक्विड मेडिकल ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारणीसाठी 15 कोटी रुपयांपर्यंत विशेष भांडवली अनुदान

लिक्विड मेडिकल ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारणीसाठी 15 कोटी रुपयांपर्यंत विशेष भांडवली अनुदान

सिंधुदुर्गनगरी

मिशन ऑक्सिजन स्वावलंबन अंतर्गत नव्याने लिक्विड मेडिकल ऑक्सिजन मॅन्युफॅक्चरिंग अलाँग वीथ स्टोरेज ॲँड सिलींडर फिलिंग फॅसिलीटी (एलएमओ) प्रकल्प उभारण्याकरिता विशेष प्रोत्साहने जाहीर करण्यात आली आहेत. त्यानुसार 50 मे. टन प्रतिदिन पेक्षा जास्त उत्पादन क्षमता असलेल्या पात्र उद्योगांनी दि.30 जून 2022 पर्यंत उत्पादनास सुरुवात केल्यास स्थिर भाडवली गुंतवणुकीच्या 20 टक्के, कमाल 15 कोटी रुपये विशेष भांडवली अनुदान 5 हप्त्यांमध्ये अनुज्ञेय करण्यात आले आहे. हे धोरण दि 31 डिसेंबर 2021 पर्यंत लागू करण्यात आले आहे.

                या अंतर्गत एमएसएमई प्रवर्गातील 50 कोटी रुपयांपर्यंत स्थिर भाडवली गुंतवणूक असलेल्या प्रकल्पांना तसेच 25 मे.टन ते 50 मे.टन प्रतिदिन आणि 50 मे.टन प्रतिदिन पेक्षा जास्त उत्पादन क्षमता असलेल्या उद्योग घटकांना (नवीन व विस्तारीकरण) प्रोत्साहने अनुज्ञेय करण्यात आली आहेत. पात्र घटकांना दि. 1 एप्रिल 2021 पासून दोन वर्षाचा गुंतवणूक कालावधी देण्यात आला आहे. पात्र गुंतवणूकदाराने प्रकल्पामध्ये गुंतवणूक सुरू करणे आणि प्रोत्साहनासाठीचा अर्ज विकास आयुक्त ( उद्योग ), उद्योग संचालनालय, मुंबई यांच्याकडे दि. 30 जून 2021 पूर्वी सादर करावा.

                या योजनेअंतर्गत 25 मे. टने ते 50 मे.टन प्रतिदिन उत्पादन क्षमता असलेल्या पात्र उद्योदांनी दि 31 डिसेंबर 2021 पूर्वी उत्पादन सुरू केल्यास स्थिर भांडवली गुंतवणूकीच्या 20 टक्के, कमाल 10 कोटी रुपये तसेच 50 मे. टन प्रतिदिन पेक्षा जास्त उत्पादन क्षमता असलेल्या पात्र उद्योगांनी दि.30 जून 2022 पर्यंत उत्पादनास सुरुवात केल्यास स्थिर भाडवली गुंतवणुकीच्या 20 टक्के, कमाल 15 कोटी रुपये विशेष भांडवली अनुदान 5 हप्त्यांमध्ये अनुज्ञेय करण्यात आले आहे. याशिवाय किमान 7 ते कमाल 12 वर्ष कालावधीसाठी औद्योगिक विकास अनुदान ( राज्य वस्तू वसेवा करावर अधारीत ), मुद्रांक शुल्क माफी (फक्त गुंतवणूक कालावधीसाठी), विद्युत शुल्क माफी, विद्युत दर अनुदान, 5 टक्के व्याज अनुदान इत्यादी प्रोत्साहनपर अनुदाने देण्यात येणार आहेत. तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या क्षेत्रामध्ये स्थापन होणाऱ्या प्रकल्पांना भूखंड वाटप सरळ पद्धतीने प्राधान्याने करण्यात येणार आहे. तर जिल्ह्यात स्थापन होणाऱ्या प्रकल्पांना भूखंड वाटप करताना प्रचलित दरामध्ये 50 टक्के सूट देण्यात येणार आहे. पहिल्या हप्त्यामध्ये भूखंडाच्या किंमतीच्या  25 टक्के रक्कम भरणा केल्यानंतर भूखंडाचा ताबा दिला जाईल. उर्वरीत रक्कम 4 हप्त्यांमध्ये 2 वर्षांच्या कालावधीमध्ये भरणा करण्याची मुभा देण्यात आली आहे. या सर्व प्रकारच्या प्रोत्साहनांसाठीची जिल्ह्यातील पात्र उद्योगांसाठीची कमाल आर्थिक मर्यादा पात्र गुंतवणूकीच्या कमाल 150 टक्के इतरी राहील.

                प्राणवायू निर्मिती (एलएमओ) उत्पादन प्रकल्पांची गुंतवणूक त्वरीत कार्यान्वित होण्यासाठी प्रकल्प उभारणीसाठी लागणारे सर्व परवाने, ना – हरकत प्रमाणपत्रे एक खिडकी योजनेंतर्गत एकत्रित परवानगी 15 दिवसांमध्ये देण्यात येईल. यासाठीची समन्वय सेवा मैत्री कक्षातर्फे प्रदान केली जाणार आहे.

                करी जिल्ह्यात लिक्विड मेडिकल ऑक्सिजन मॅन्युफॅक्चरींग अलाँग वीथ स्टोरेज अँड सिलींडर फिलिंग फॉसिलिटी ( एलएमओ ) नवीन प्रकल्प उभारण्यास इच्छुक असलेल्या अथवा सध्याच्या प्रकल्पाचे विस्तारीकरण करण्यास इच्छुक असलेल्या उद्योजकांनी उद्योग संचालनालय, नवीन प्रशासन भवन, दुसरा मजला, मंत्रालयासमोर, मुंबई – 32 येथे संपर्क साधावा, असे आवाहन संतोष कोलते, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 + 7 =