You are currently viewing सहामाही परीक्षा येऊन ठेपल्या तरी शालेय विद्यार्थी पाठ्यपुस्तकांपासून वंचित..!

सहामाही परीक्षा येऊन ठेपल्या तरी शालेय विद्यार्थी पाठ्यपुस्तकांपासून वंचित..!

सहामाही परीक्षा येऊन ठेपल्या तरी शालेय विद्यार्थी पाठ्यपुस्तकांपासून वंचित..!

शालेय शिक्षण विभागाचा गजब कारभार.?

यु-डायस प्रणाली मुले उद्भवलेल्या तांत्रिक समस्यांकडे शालेय शिक्षण मंत्री लक्ष देणार का..कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांचा सवाल

सिंधुदुर्ग

शालेय विद्यार्थ्यांना शासनाकडून जो पाठ्यपुस्तक पुरवठा केला जातो, मुलांच्या सहामाही परीक्षा तोंडावर आल्या तरीही जवळपास 10 टक्के विद्यार्थी अद्याप पाठ्य पुस्तकांपासून वंचित राहिले असल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे. यूडायस प्रणालीद्वारे पाठ्यपुस्तकांचा पुरवठा शाळांना जो केला जातो तो मागील वर्षीच्या पटसंख्येवरून केला जातो.प्रत्यक्षात शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस विद्यार्थी संख्येत तफावत आढल्यामुळे शिल्लक राहिलेल्या जिल्ह्यातील जवळपास 10 टक्के विद्यार्थी सहामाही परीक्षा आल्या तरीही पाठ्यपुस्तकंपासून वंचित राहिले आहेत ही अतिशय दुर्दैवाची व गंभीर बाब आहे. पटसंख्येपेक्षा अधिक पुस्तके वितरित झालेल्या काही शाळांकडून पुस्तकांचा परतावा देखील अद्याप झालेला नाही.शालेय शिक्षण विभागाच्या या भोंगळ व नियोजनशून्य कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना बसत असून त्यांचे शैक्षणिक नुकसान देखील झाले आहे. शालेय शिक्षण मंत्री याची गंभीर दखल घेणार का असा मनसेचा सवाल असून शालेय शिक्षण विभागाकडून येत्या आठ दिवसांत पाठ्यपुस्तके वितरित न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षण विभागाच्या निषेधार्थ घंटानाद आंदोलन करेल असा इशारा मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 4 =